शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबत जगताना व्यावसायिकांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST

'लॉकडाऊनमध्ये टप्प्यानुसार शिथिलता देण्यात आली. ८ जूनपासून ‘अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागले. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनीही संकटावर मात करीत पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपआपला व्यवसाय सुरु केला आहे; परंतु ग्राहकांचा प्रतिसाद कमीच मिळत आहे.

ठळक मुद्देग्राहकांची संख्या रोेडावली : बाजारपेठा सुरू; मात्र व्यवसाय मंदावला

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : लॉकाडाऊनमध्ये घरी बसून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा संघर्ष आता सुरु झाला आहे. 'मिशन अनलाकनंतर हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात कर्ज, उसनवारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला; मात्र आता कोरोनासोबत जगण्यासाठी संघषार्ची लढाई सुरु झाली आहे.'लॉकडाऊनमध्ये टप्प्यानुसार शिथिलता देण्यात आली. ८ जूनपासून ‘अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागले. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनीही संकटावर मात करीत पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपआपला व्यवसाय सुरु केला आहे; परंतु ग्राहकांचा प्रतिसाद कमीच मिळत आहे.लॉकडाऊनपूर्वी शिंपी व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता. आठवड्यातून ५ ते ८ हजार रुपये मजुरी मिळत होती. २० ते २५ ड्रेस शिवण्यासाठी येत होते. आता केवळ सात ते आठ ड्रेस येत असल्याची माहिती येथील व्यवसायाने टेलर असलेले जांभुळे यांनी दिली. शिंपी व्यवसायाला अनलॉकनंतर गती मिळाली आहे; लॉकडाऊनमुळे येथील २०० ते ३०० रुपये रोजंदारी मिळवून उदरनिर्वाह करणारे टेलर हवालदिल झाले होते. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर काही टेलरचा पुन्हा व्यवसाय सुरु झाला आहे. मात्र उत्पन्न मिळण्याचा वेग संथच आहे.लॉकडाऊनपूर्वी दररोज किमान हजार रुपयांची कमाई होत होती; परंतु आता एक हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत. सर्व लोक घरात बसून असल्याने व मजुरी बंद असल्याने नागरिकांकडे पैसे नाही आहेत. याचा सरळ चप्पल, बूट विक्रीवर परिणाम झाल्याचे चप्पल विक्रेता राजेराम गणवीर यांनी सांगितले.फुल, हार विक्रीला फटकालॉकडाऊनपूर्वी विविध फुले, हार विक्रीच्या व्यवसायातून दररोज किमान एक हजार रुपयांची कमाई होत होती; परंतु लॉकडाऊनमध्ये मंदिरे बंद झाली. लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे फुल, हार खरेदी बंद झाली. आता दुकाने सुरू झाली. मात्र फुल, हार खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे, अशी माहिती फुल विक्रेता अजय कुत्रे यांनी दिली.सकाळपासून ग्राहकाची प्रतीक्षासध्या आंबे विक्री सुरू आहे; मात्र सकाळपासून ग्राहक आंबे घ्यायला आले नाही. त्यामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहो. दिवसाला केवळ ३०० रुपये मिळतात; परंतु त्यासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागत असल्याची व्यथा आंबे विक्री करणाऱ्या नीलकंठ नागोसे यांनी व्यक्त केली. आंबे खरेदी करण्यापूर्वी हे आंबे कुठले आहेत, ज्या भागातून आंबे आणले तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे का, असे अनेक प्रश्न ग्राहकांकडून विचारल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय