शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उभे पीक केले उद्ध्वस्त

By admin | Updated: October 4, 2014 23:24 IST

शेती कामासाठी व घरच्या आर्थिक कामासाठी एका शेतकऱ्याने पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्या मोबदल्यात सावकाराने शेतकऱ्याची सात एक जागा विक्री करुन घेतली.

आर्वी येथील प्रकार : अवैध सावकाराने आवळला पाशकोठारी : शेती कामासाठी व घरच्या आर्थिक कामासाठी एका शेतकऱ्याने पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्या मोबदल्यात सावकाराने शेतकऱ्याची सात एक जागा विक्री करुन घेतली. जेव्हा पैसे परत देण्यासाठी संबंधित शेतकरी गेला तेव्हा सावकाराने संतापाने मध्यरात्री त्या शेतकऱ्याच्या शेतात तीन ट्रॅक्टर फिरवून शेती उद्ध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार गोंडपिंपरी तालुक्यातील आर्वी येथे घडला. याबाबत शेतकऱ्याने लाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आर्वी येथील शेतकरी रमेश मेश्राम याने शेतीच्या कामसाठी अब्दुल अजिज शेख यासिन (रा.लालपेठ कॉलरी चंद्रपूर) याच्याकडून टप्याटप्याने तीन लाख रुपये पाच टक्के व्याज दराने घेतले. मात्र या व्यवहारात या सावकाराने शेतकऱ्याची भूमान क्र. १८५/१ आराजी २.७१ हे. आर शेती विक्री करुन घेतली. व्याजासह तीन लाख रुपये परत केल्यानंतर शेती पुन्हा रमेशच्या नावाने करून देण्याचे तोंडी ठरले. आजच्या बाजार भावाप्रमाणे सदर शेतीची किंमत ३० लक्ष रुपये आहे. शेतकऱ्याने स्वत:जवळ पैसे जमा होताच, सावकाराच्या कर्जाची परतफेड केली व शेती स्वत:च्या नावाने करून देण्याचा तगादा लावला.मात्र सावकार अब्दुल अजिज शेख यासिन याने शेती हडप करण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्याने २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री रमेश मेश्राम याच्या शेतात तीन ट्रॅक्टर फिरवून कापूस, सोयाबीन व तुरीचे उभे पीक उद्ध्वस्त केले. त्यासोबत रमेशचा भाऊ आर्वी येथील पोलीस पाटील सुरेश मेश्राम याच्या भू.०.९२ हे. आर या शेतातही ट्रॅक्टर फिरवून पीक नांगरुन उद्धवस्त केले. सदर प्रकार सुरेश सकाळी शेतात गेल्यानंतर समजला. त्याने लाठी पोलिसात तक्रार दाखल करून अब्दुल अजिज शेख यासीन, शरद गोपीनाथ ढोके व रमेश नारनवरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. (वार्ताहर)