शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवातावरण तापले : ४ जानेवारीला अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी ४ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर पंचायत समिती सभापतीपदासाठी १ जानेवारी रोजी संबंधित पंचायत समितीमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शनिवारी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात पीठासीन अधिकारी तथा मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी १ जानेवारी रोजी संबंधित तालुक्याचे तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत सभापतीची निवडणूक घेणार आहे. जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंचायत समिती सभापतीपदाच्या या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.१ जानेवारीला ठरणार नवे पं.स.सभापतीमागील महिन्यात जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत निघाली. अध्यक्षपद महिला (सर्वसाधारण) साठी राखीव आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६, कॉंग्रेसचे २० सदस्य आहेत. भाजपमध्ये अध्यक्ष होण्यासाठी अनेक नावांची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या निवडणीबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम राहणार आहे. सध्या भाजपकडून संध्या गुरूनुले, वैष्णवी बोडलावार, अर्चना जीवतोडे, बुध्दलवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मध्यल्या काळात कॉंग्रेसने भाजपच्या असंतुष्ठ सदस्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी कॉंग्रेसच्या काही सदस्यांची गाठी-भेटी घेतल्या. त्यांना सभापतीची आॅफरही दिली होती. मात्र, त्या आमिषाला सदस्य बळी पडले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या हालचाली काही दिवसांपासून मंदावल्या होत्या. आता निवडणूक कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे आता पुन्हा कॉंग्रेस तसेच भाजपकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद