शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ नसल्याने वरोरातील सोनोग्राफी मशीन धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा शहर, माढेळी, कोसरसार, नागरी, सावरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा तालुक्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यात या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळंतपणेही करण्यात आल्याने रुग्णालयाला शासनाने पुरस्कारही घोषित केला आहे.

ठळक मुद्देवरोरा उपजिल्हा रुग्णालय : गर्भवतींना जावे लागते चंद्रपूरला

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र मागील पाच महिन्यांपासून तज्ज्ञाशिवाय धूळखात पडले आहे. त्यामुळे रुग्णांसह गर्भवतींना सोनोग्राफी करण्याकरिता चंद्रपूर येथे जावे लागते. यामध्ये शारीरिक तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा शहर, माढेळी, कोसरसार, नागरी, सावरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा तालुक्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यात या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळंतपणेही करण्यात आल्याने रुग्णालयाला शासनाने पुरस्कारही घोषित केला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येथील सोनोग्राफी यंत्र सुस्थीत होते. परंतु जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सोनोग्राफी तज्ज्ञ आले नसल्याने एकही सोनोग्राफी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी चंद्रपूरला जावे लागत आहे. यामध्ये वेळ व पैसाही खर्च होत आहे. यातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असल्याने स्वत:च्या वाहनाने चंद्रपूर येथे जाणे त्यांना अवघड होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीसुद्धा बंद आहे. त्यातच काही ठिकाणी एसटी सुुरु आहे. मात्र एसटीने जाण्यावरही निर्बंध घालण्यात आल्याने त्यांना फार मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोनोग्राफी तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अतुल वानखेडे यांनी वैद्यकीय अधिक्षकांनाना निवेदनही दिले आहे. मात्र अद्यापतरी यावर तोडगा निघाला नाही.सोनोग्राफी तज्ज्ञावर कोरोनाचे सावटवरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी तज्ज्ञ नागपूर येथून येत होते. मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी सुरू झाल्याने तज्ज्ञाचे येणे बंद झाले. वरोरा येथे आल्यास क्वारंटाईन व्हावे लागेल या भीतीने ते येत नसल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी सोनोग्राफी यंत्र धूळखात आहे.पूर्वी असलेले तज्ज्ञ सद्या येवू शकत नाही. परिसरातील तज्ज्ञांशी बोलणे सुरू आहे. परंतु आजतागत सोनोग्राफी यंत्र तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली नाही.- डॉ. जी.एल. दुधे, अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय, वरोरा

टॅग्स :hospitalहॉस्पिटल