शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातून होताहे मातीचे सर्रास खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे. मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला.

ठळक मुद्देउमा नदीचे नैसर्गिक पात्र संपुष्टात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. सदर कामासाठी रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, डोंगरगांव ते रत्नापूर या रस्त्याचे तसेच उमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. याच पुलाजवळ माती तस्करांनी मोठमोठे खड्डे करून तस्करी सुरु केली आहे. यामध्ये शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रातील खड्ड्यांमुळे भविष्यात अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. या कामाला सुरुवात झाली असून नदीवरील पुलाचे पिल्लरसुद्धा उभे झाले आहे.मात्र सदर कामाच्या बाजुने नदीपात्रातून पोकलॅन्डव्दारे मोठ्या प्रमाणात मातीचे खनन केले जात आहे. त्यामुळे पात्रामध्ये ७ ते ८ फुट खोल खड्डे पडले असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खनन प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हामहासचिव राकेश रत्नावर यांनी प्रशासनाकडे केली आहे.अपघात झाल्यास जबाबदार कोणमौजा डोंगरगांव येथील नदीघाटावरून मातीचे खनन केल्या जात असल्यामुळे काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाळ्यात सदर खड्डे पाण्याने भरतील त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण जाणार आहे. परिणामी एखाद्यावेळी अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. त्याच्या काही अंतरावरच स्मशानभुमी आहे. येथे मोठ्या संख्यने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेकडो ब्रास मातीची चोरीपोकलॅन्डच्या माध्यमातुन नदीतून मातीचे खनन केले जात आहे. हायवाद्वारे ही माती इतरत्र नेली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे दिसत आहे.डोंगरगांव-रत्नापूर मार्गावरील नदीपात्रातील मातीच्या खननाबाबत पथकाद्वारे चौकशी केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास खनन करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- डी. जी. जाधव, तहसीलदार, मूल

टॅग्स :riverनदी