शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात सिरो सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉनमध्ये केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. संस्थात्मक विलगीकरण केंद्रांची निर्मिती केली.

ठळक मुद्देमनपाकडून तयारी : अँटिबॉडी झाल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी कोणत्या वार्डातील किती लोकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी तयार झाली, हे तपासून पाहण्यासाठी चंद्रपूर शहरात लवकरच सिरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणातंर्गत सर्व वॉर्डातून किती लोकांच्या रक्ताचे नुमने घ्यायचे, यासाठी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यासाठी मनपा आरोग्य प्रशासनाकडून नियोजन केल्या जात आहे.कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉनमध्ये केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. संस्थात्मक विलगीकरण केंद्रांची निर्मिती केली.मागील महिन्यात शहरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षणही करण्यात आले. मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये दररोज शेकडो रूग्णांची तपासणी आजही सुरूच आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळ्ल्याने मनपाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्याप्ती वाढविली.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी सर्वेक्षणाला आजपासून सुरू झाली. अशा प्रकारचे सर्वेक्षण चंद्रपूर महानगरात घेण्यात येणार आहे. मनपा आरोग्य अधिकाऱ्यांच्यार नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. प्रत्येक पथकात २ डॉक्टर, १ लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट व आरोग्य कर्मचाºयांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. सिरो सर्वेक्षणासाठी मनपा विशेष बसेसची व्यवस्था करावी लागणार आहे. किमान पाच दिवस चालणाºया या सर्वेक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सर्वेक्षणात प्रत्येक वार्डातून किमान २० ते ३० रक्ताचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासले जातील.त्याकरिताही एक विशेष पथक कार्यरत राहणार आहे. लोकांच्या रक्ताची तपासणी करून कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी किती अँन्टिबॉडी तयार झाल्या आहेत, याची माहिती पुढे येईल. त्यानंतर उपलब्ध नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी औषधशास्त्र विभागाच्या तज्ज्ञ पथकाकडे सोपविण्यात येणार आहे.रॅण्डम पद्धतीचा वापरचंद्रपूर शहरातील किती लोकांच्या रक्ताची तपासणी होणार हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, तपासणी कुणाची करायची हे रॅण्डम पद्धतीने म्हणजे नमुना निवड पद्धतीने ठरणार आहे. प्रत्येक वार्डातील लोकसंख्येनुसार चिठ्ठ्या टाकून आधी संबंधित वार्डाची निवड केली जाईल. त्यानंतर त्याठिकाणी प्रत्येकी १० घरानंतर एका घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अ‍ॅन्टिबॉडी सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी विशेष वैद्यकीय पथकाची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे. चंद्रपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर संपूर्ण तयारीनिशी सिरो सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे.- डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी, मनपा,चंद्रपूरक्वारंटाईनपासून सुटकासिरो सर्वेक्षणात रक्त नमुने घेतलेल्या व्यक्तीला गृह विलगीकरण क्वारंटाईन केले जाणार नाही. अशा प्रकारचे सर्वेक्षण देशाची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित व्यक्तींना क्वारंटाईन केले नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील मोठ्या महानगरात असे सर्वेक्षण होणार असल्याने चंद्रपूर मनपानेही तयारी सुरू केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या