शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांचा रस्ता सात दिवसात उखडला

By admin | Updated: April 1, 2015 01:19 IST

जिल्हा परिषद विभागाच्या बेबंदशाही कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिलाची उचल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिवती : जिल्हा परिषद विभागाच्या बेबंदशाही कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिलाची उचल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील आसापूर-पेदाआसापूर येथील घाटावर सात लाख रुपये खर्च करून रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र खडीकरणाचा रस्ता सातच दिवसात उखडला असून जिल्हा परिषद विभाग रस्त्याच्या कामाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.पेदाआसापूर गावातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रस्ता सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा परिषद विभागाकडून अनेक दिवसांच्या मागणीनंतर ६०० मीटर कामासाठी सात लाखाचा निधी मंजूर केला होता. मात्र संबंधीत कंत्राटदाराने आपली पोळी शेकून घेण्यासाठी थातुरमातूर कामे केल्याने अल्पावधीत रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या आहेत. अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात समस्यांच गुंता कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज एक ना एक नव्या समस्येत भर पडत आहे. तालुक्यातील गावे तालुक्याशी जोडली जावी यासाठी कुठे सार्वजनिक विभागाची कामे तर कुठे जिल्हा परिषद विभागाची कामे सुरू आहेत. मात्र त्या कामावर नियंत्रण ठेवून काम चंगले करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारासोबत आपले चांगभलं करून रस्त्याची वाट लावली जात आहे. आधीच या परिसरात विकासात्मक कामे लवकर मंजूर होत नाही. अनेक दिवसांच्या मागणीनंतर काम कसे तरी मंजूर होतात. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढून कंत्राटदार मोकळे होतात. हा सगळा प्रकार त्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना माहीत असतो, तरी पण कामाची बिले काढतात कसे, कामाची गुणवत्ता तपासली का जात नाही, तपासली जात असेल तर उखडलेला रस्ता परत दुरुस्त करून घेणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)