किडनी प्रकरणातील रोशन कुळे यांना ५ लाखांची मदत मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:06 IST2026-05-13T19:02:44+5:302026-05-13T19:06:01+5:30

Chandrapur : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

Roshan Kule in kidney case granted Rs 5 lakh assistance | किडनी प्रकरणातील रोशन कुळे यांना ५ लाखांची मदत मंजूर

Roshan Kule in kidney case granted Rs 5 lakh assistance

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. सावकारीच्या जाचामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रोशन कुळे यांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

रोशन कुळे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. शेतजमीन सावकारांकडे गहाण गेल्याने कुटुंब मोठ्या अडचणीत आले होते. या प्रकरणाकडे 'लोकमत'ने वृत्तातून लक्ष वेधले होते. त्यानंतर रोशन कुळे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आपली व्यथा मांडली होती.

यानंतर आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित विभागांशी समन्वय साधल्यानंतर अखेर ५ लाख रुपयांची मदत मंजूर झाली. दरम्यान, १९ मे रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही मदत धनादेशाद्वारे प्रदान करण्यात येणार आहे.

"मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी शासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांशी समन्वय साधत हे प्रकरण संवेदनशीलतेने मांडले. अखेर मुख्यमंत्र्यांनी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला."
- सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री तथा आमदार.

Web Title : रोशन कुले किडनी मामला: ₹5 लाख की सहायता मंजूर

Web Summary : किडनी की समस्या और साहूकारों के कारण आर्थिक संकट का सामना कर रहे रोशन कुले को विधायक सुधीर मुनगंटीवार के हस्तक्षेप के बाद मुख्यमंत्री राहत कोष से ₹5 लाख की सहायता मिली। 'लोकमत' ने उनकी दुर्दशा को उजागर किया। सहायता चंद्रपुर कलेक्टर कार्यालय में प्रदान की जाएगी।

Web Title : Roshan Kule Kidney Case: ₹5 Lakh Aid Approved

Web Summary : Roshan Kule, facing financial hardship due to kidney issues and moneylenders, receives ₹5 lakh aid from the Chief Minister's Relief Fund after MLA Sudhir Mungantiwar's intervention. 'Lokmat' highlighted his plight. The aid will be provided at Chandrapur Collector Office.