शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जीओवरून आमसभेत गदारोळ

By admin | Updated: August 1, 2014 00:11 IST

रिलायन्स जीओचे खोदकाम व टॉवर्स उभारणीच्या प्रकरणावरून आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत पुन्हा गदारोळ झाला. अखेर याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली.

सत्ताधाऱ्यांचा पुन्हा विरोध : मतदान नाकारल्याने नगरसेवकांनी सभेतून केले बहिर्गमनचंद्रपूर : रिलायन्स जीओचे खोदकाम व टॉवर्स उभारणीच्या प्रकरणावरून आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत पुन्हा गदारोळ झाला. अखेर याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली. मात्र मनपा पदाधिकाऱ्यांनी यास नकार दिल्याने बहुसंख्य नगरसेवकांनी सभेतूनच बहीर्गमन केले.रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीचे भूमिगत खोदकाम व टॉवर्स उभारणीचे प्रकरण अद्यापही सुटू शकले नाही. मनपा पदाधिकारी याबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगून आहेत तर सत्ताधारी काँग्रेस व भाजपाच्या नगरसेवकांनी याला विरोध दर्शविला आहे. आज महापालिकेच्या सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली होती. या आमसभेत विषय क्रमांक ४२ अन्वये पुन्हा हाच विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. यापूर्वीच्या ३० जूनच्या आमसभेतही रिलायन्स जीओला खोदकाम करणे व टॉवर्स उभारणे यासाठी ५० ते ५५ नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. मात्र प्रोसेडींगमध्ये केवळ काँग्रेसच्या सहा व भाजपाच्या १५ सदस्यांची नावे टाकली. याशिवाय या सभेत सदर विषयावर सभागृहात जी चर्चा झाली तीदेखील प्रोसेडींगमध्ये चुकीची लिहिण्यात आली, यावर काँग्रेस व मित्रपक्षांच्या नगरसेवकांनी यावेळी आक्षेप घेतला. जोपर्यंत सुप्रिम कोर्टाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत रिलायन्स जीओचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत आयुक्तांनी केबल टाकणे व टॉवर्स उभारणे या दोन्ही कामांना स्थगिती दिल्यानंतरही भूमिगत केबलींगचे काम कसे सुरू आहे, याचा जाब विचारत नगरसेवकांनी एकच गदारोळ केला. शहरामध्ये टॉवर्स उभारावे की नाही, याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी सभेत तब्बल ४५ मिनिटे रेटून धरण्यात आली. या मतदान प्रक्रियेद्वारे जनतेला कळू द्या की कोण टॉवर्स उभारणीच्या बाजुला आहे व कोण नाही, असेही बजावण्यात आले. मात्र महापौर व उपमहापौर यांनी ही मागणी मान्य केली नाही. मतदान घेणार नाही, असे सांगितल्याने अनेक नगरसेवकांनी बहिर्गमन केले. यात प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, अनिता कथडे, सुनिता अग्रवाल, शिल्पा आंबेकर, उषा धांडे, विणा खनके, कश्यप, सकिना अंसारी आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)