परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:01:05+5:30

कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे.

Returned youth to agriculture | परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त

परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त

Next
ठळक मुद्देबेरोजगारीवर मात : शहरातील तरुणांचे लक्ष आता शेती व्यवसायाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शहरातील तरुण गावाकडे परतत आहे. हाताला काम नसल्याने यातील अनेक जण शेतीकडे वळत असून आता गावात शेतीवरच त्यांची भिस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील अनेक तरुण आपल्या कुटुंबासह पुन्हा गावाकडे परत येत आहेत. मात्र, त्यांना तूर्त गावाकडे येण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने ही कुटुंबे शहरात अडकली आहे.
कोरानामुळे सर्वत्र आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्याचा विपरीत फटका ग्रामीण भागालाही बसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मागणी नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यातच मोठ्या संख्येने तरुणांचे लोंढे आता ग्रामीण भागात जात आहे. जगण्यासाठी किमान आवश्यक सुविधा तरी गावातच मिळेल, अशी आशा या तरुणांना आहे.
मागील काही दिवसात शेतीची चांगली अवस्था नाही. मात्र भविष्यात शेतीचे चांगले दिवस येथील या आशेवर अनेक तरुणांनी आता पुन्हा शेतीकडे आपले लक्ष केंद्रीत करीत आहेत.
शहरातून आलेल्या काही तरुणांनी आधुनिक शेतीची कास धरुन शेतीपूरक व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. छोटे-छोटे कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. कोरोनानिमित्ताने का होईना पण शेतीला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील, असा विश्वास ग्रामीण भागातील शेतकºयांना आहे.

शेतीला येतील चांगले दिवस
कोरोनाते मोछे संकट असले तरी शेतीला पुन्हा चांगले दिवस येण्याची चिन्ह ग्रामीण नागरिकांनी आहे. घरातील तरुण नोकरीनिमित्ताने पुणे, मुंबईसारख्या शहरात गेले. त्यामुळे शेती करण्यासाठी घरातही माणसे नाहीत आणि मजुरही मिळत नाही, अशी अवस्था आहे. परंतु आता शहरातील गेलेल्या तरुणांनी शेतीच उत्तम असल्याचे मान्य केले आहे, तर व्यापार दुय्यम आणि नोकरी कनिष्ठ ठरवत आहे. त्यामुळे पूर्वीचे सूत्र पुन्हा लागू होणार आहे.
गाव खेड्याला कायम दुय्यम समजणारी मंडळी कोरोनाचा धसका घेऊन आपला गाव बरा म्हणू लागली आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव शहरी भागात झपाट्याने वाढत असल्यामुळे नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने शहरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी आता गावाकडचा रस्ता धरला आहे. शहरातील माणसांचा ग्रामीण भागात वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाची भीती बळावत आहे. स्थानिक प्रशासनासह वैद्यकीय विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहे.

Web Title: Returned youth to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.