शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील रब्बी पिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : कोरोनाच्या दहशतीने डोळ्यात आणले पाणी

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : खरीप हंगामातील उत्पादनात झालेली घट भरून काढण्यासाठी यावर्षी पहाडावरील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रीत केले. अनुकूल वातावरणामुळे यावर्षी पिकेही दमदार आली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या दहशतीत शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.सेवादासनगर येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर पहाडावरील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरापाई द्यावी, अशी मागणी येथील सरपंच विमल राठोड यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक आडवे झाले आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आली तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. ही तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी खत, कीटकनाशक आदींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मात्र हा हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे रब्बीनेही शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले नसल्याचे स्थिती आहे. एकिकडे कोरोनाची दहशत आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा यामध्ये पहाडावरील शेतकरी अक्षरश: दबला गेला आहे.यंदा रब्बी हंगामातील पिके चांगली आली होती. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.- संजय चव्हाणशेतकरी, सेवादासनगर.अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे.- विमल राठोड,सरपंच, नोकेवाडा

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती