शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वसाहतीचा प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाºयांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून नागभीड येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. हे पोलीस ठाणे अडीच एकर जागेमध्ये वसले आहे.

ठळक मुद्देकर्तव्य पार पाडताना अडचणी : भाड्याने घर देताना शहरातील काहींचा नकार

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथे नवीन पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीच्या प्रस्तावाला शासनाने दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. मात्र, हा प्रस्ताव रखडल्याने पोलिसांना भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहेत.नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाऱ्यांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून नागभीड येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. हे पोलीस ठाणे अडीच एकर जागेमध्ये वसले आहे. परंतु पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने नसल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.नागभीड-ब्रह्मपुरी या राष्ट्रीय मार्गावरील हे पोलीस ठाणे अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. पोलिसांना निवासस्थानाअभावी ताण सहन करावा लागत आहे. पोलीस हा जनतेचा मित्र असतो. दिवसरात्र कर्तव्यावर राहावे लागते. त्यांना हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. परंतु येथे मात्र निवासाची व्यवस्था नसल्याने कुटुंबांना भाड्याच्या घरात राहून जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे.पोलीस ठाण्यासाठी अडीच एकर जागा उपलब्धनागभीड येथील पोलीस ठाण्याला अडीच एकर जागा उपलब्ध आहे. ब्रिटीशांनी पोलीस ठाण्याची इमारत, १ पोलीस निरीक्षक व ६ पोलीस कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधली होती. पण ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. सध्या १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ उपनिरीक्षक व ४८ पोलीस कार्यरत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस