शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रांत ७५ डॉक्टर रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:54 IST

ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत.

ठळक मुद्देसमुपदेशनातून नियुक्ती : आरोग्य सेवेला मिळाले बुस्टर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार करता यावे, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ७५ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. आरोग्य केंद्रातील रिक्तपदी बीएएमएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची (गट अ) नुकतीच समुपदेशनाने नियुक्ती झाल्याने जनतेच्या आरोग्य समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत. केवळ ४१ वैद्यकीय अधिकारी आहेत. उर्वरीत रिक्त पदांमुळे दर्जेदार आरोग्य सेवा देण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढल्या. परिणामी, राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित करण्यात आली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड आदींनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७५ वैद्यकीय अधिकाºयांची कंत्राटी स्वरूपातनियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावा, याकरिता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा व औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात आला.-डॉ. राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्ह्यात बीएएमएस पदवीप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३५ पदे मंजूर आहेत. यापैकी ३३ पदे कार्यरत असुन २ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे लवकरच भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना उपचारासाठी संकटांचा सामना करावा लागणार नाही, यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य