भाजीपाला, किराणा आणि फळांच्या किंमतीही भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:23+5:30

किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे.

Prices of vegetables, groceries and fruits also skyrocketed | भाजीपाला, किराणा आणि फळांच्या किंमतीही भडकल्या

भाजीपाला, किराणा आणि फळांच्या किंमतीही भडकल्या

Next
ठळक मुद्देबजेट कोलमडले। किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचे संकट त्यातच परतीच्या पावसाचा धुमाकुळ यामुळे बाजारपेठांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी सामान्य नागरिकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. अन्यधान्य, तेलांच्या किंमती वाढल्या असतानाच आता भाजीपाल्यानेही यात भर घातली आहे.
किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. तर मोसंबी ८०० रुपयांवरून १ हजार ३०० रुपयांवर तर दाळींब २० किलोचा कॅरेट १ हजार ६०० रुपयांवर २ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. यामुळे चिल्लर व्यावसायिकांनीही दरवाढ केली आहे. परिणामी ग्राहकांना मोठा आर्थिक फटसा सहन करावा लागत आहे.

तूर डाळ २० रुपयांनी महागली
मागील दहा दिवसांपूर्वीच्या तुलनेत तूळ दाळीमध्ये २० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. पूर्वी १०० रुपये किलो असणारी दाळ आता १२० रुपये किलोने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यासोबतच खाद्य तेलांच्या किंमतीमध्ये प्रति किलो पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना अडचण जात आहे.

फळांच्या किंमती वाढल्या
नवरात्रोत्सवामुळे फळांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसाच्या तुलनेमध्ये किलोमध्ये प्रत्येक फळांच्या किंमतीत ५० ते ६० रुपयांची वाढ झाली.

परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बाहेरून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही कमी झाल्याने मागील काही दिवसात किंमती झपाट्याने वाढल्या आहे. आठवड्याच्या भाजीपाल्यासाठी किमान पाचशे रुपये मोजावे लागत आहे.

Web Title: Prices of vegetables, groceries and fruits also skyrocketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.