शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आले रे ,पळा पळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

दुपारच्या वेळी टाईमपास करण्यासाठी प्रत्येक गल्लीबोळात मुलांचा व तरूणांचा घोळका गप्पा मारत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घोळका दिसताच दुचाकीवर अचानक आलेल्या पोलिसांकडून प्रत्येकाला प्रसाद देण्यात येत आहे. घोळका हटविण्यासाठी व रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी काही व्यक्ती अचानक शिट्टी वाजवित असताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देचौका-चौकात असतो ठिय्या : सायरन वाजताच तरूण ठोकतात धूम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी देशात लॉकडाऊ न करण्यात आले आहे. परिणामी उन्हाळकी करत फिरणाऱ्यांनाही घरातच तळ ठोकावा लागत आहे. मात्र तरीही अनेकजण घराबाहेर कट्ट्यावर ठिय्या मांडून गप्पा मारत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पोलिसांची गाडी येताच, सायरनचा आवाज कानावर पडताच प्रत्येकजण काठीचा प्रसाद टाळण्यासाठी जीवाच्या आकांताने ‘पोलीस आले रे...आले, पळा पळा’ म्हणत धूम ठोकताना दिसत आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत असे दृश्य वारंवार पहायला मिळत आहे.राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेआहे. सकाळच्या सत्रात केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास नारिकांना मुभा आहे. त्यामुळे यावेळेतच आवश्यक वस्तूंची खरेदी होत आहे. दुपारच्यावेळी व संध्याकाळी काही खोडकर मुले व तरूण मात्र विनाकारण रस्त्यावर येताना अजूनही दिसून येत आहेत.दुपारच्या वेळी टाईमपास करण्यासाठी प्रत्येक गल्लीबोळात मुलांचा व तरूणांचा घोळका गप्पा मारत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घोळका दिसताच दुचाकीवर अचानक आलेल्या पोलिसांकडून प्रत्येकाला प्रसाद देण्यात येत आहे. घोळका हटविण्यासाठी व रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी काही व्यक्ती अचानक शिट्टी वाजवित असताना दिसून येत आहेत. ही शिट्टी पोलिसांची नसली तरी आवाज मात्र पोलिसांच्या शिट्टीसारखाच असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसून येत आहे.संध्याकाळच्या वेळी गल्लीबोळात एकत्रित आलेल्या घोळक्याला दुचाकीवर पोलीस दिसले तर लगेच त्यांच्याकडून पोलीस आले रे आले पळा पळा.. असे ओरड पळण्यास सुरूवात होताना दिसून येत आहे. त्यामुळे गडबडीत पळून घरी लपून बसण्याचा प्रकार पहायला मिळत आहे. चौकात व गल्लीबोळात आपल्यापैकीच एका खोडकर मित्राने वाजविलेल्या शिट्टीमुळे अनेकांची चांगलीच धांदल उडल्याचे पाहून हास्यकल्लोळही होत आहे.विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा प्रसादकोरोना विषाणू टाळण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस विभाग तसेच मनपा प्रशासनातर्फे जनजागृतीपर संदेश स्पीकरद्वारे देण्यात येत आहेत. मात्र तरीसुद्धा अनेकजण विनाकारण फिरताना आढळून येतात. बाहेर न पडण्याचे संदेश स्पीकरवरून देण्यात येत असूनही सुचनांचे पालण होत नसल्याने अनेकदा पोलिसांकडून विनाकरण फिरणाºयांना प्रसाद देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.अनेकांची वाहने जप्तपोलिसांनी गांधी चौक, जटपुरा गेट, रामनगर चौक, गिरणार चौक, बसस्थानक चौकात नाकाबंदी करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा सुचना असतानाही अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनाद्वारे बाहेर पडत आहेत.अशाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ज्याच्याकडे बाहेर पडण्याचा परवाना आहे. त्यांना सोडून देण्यात येत आहे. तर विनाकारण बाहेर पडणाºयाची वाहने जप्त करण्यात येत आहेत. तर अनेकांचे चालणेही फाडण्यात येत आहे.

टॅग्स :Policeपोलिस