वर्धा नदी बेलोरा पुलाची दुर्दशा

By Admin | Updated: October 9, 2016 01:31 IST2016-10-09T01:31:56+5:302016-10-09T01:31:56+5:30

चंद्रपूर-यवतमाळ मार्गावरील बेलोरा(घुग्घुस) नजीक वर्धा नदीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.

The plight of the Wardha river Belora bridge | वर्धा नदी बेलोरा पुलाची दुर्दशा

वर्धा नदी बेलोरा पुलाची दुर्दशा

घुग्घुस : चंद्रपूर-यवतमाळ मार्गावरील बेलोरा(घुग्घुस) नजीक वर्धा नदीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातून पुलाच्या सळाखी दिसू लागल्या आहेत. या पुलावरून रात्रंदिवस जड वाहतुकीबरोबरच अन्य वाहनाची वर्दळ असल्याने धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
सदर पुलाच्या रस्ता दुरुस्ती करीता एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुलावरून रात्रंदिवस रहदारी असून दुसरा मार्ग नसल्याने विदेशी तंत्राच्या (टेक्नलाजी) सहाय्याने दुरूस्तीचे काम करण्यात येत आहे. सध्या काम सुरू केले आहे. मात्र पाऊस पडत असल्याने रस्ता निर्माण कार्यात अडचण येत आहे. हे कारण पुढे करून काम बंद करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या पुलाची दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत आहे. त्यामुळे पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

Web Title: The plight of the Wardha river Belora bridge