शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत १० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. अजून आठ ते दहा हजार हेक्टरवरील रोवणीची कामे शिल्लक आहे.

ठळक मुद्देधान पट्ट्यावर दुष्काळाचे सावट : सिंचन प्रकल्पात नाममात्र पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : वातावरण बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत आहे. यावर्षी तालुक्यात सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. अजून आठ ते दहा हजार हेक्टरवरील रोवणीची कामे शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. परिणाम सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी धानाच्या रोवण्या केल्या त्यांचेही सध्या बेहाल होत आहेत. पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. दरम्यान, रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आत्तापासूनच भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी नदी, नाले, बोड्या, कोरड्या पडल्या आहे. सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने सध्या केलेल्या रोवण्या वाचविण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसाच्या अनिश्चिततेमुळे तालुक्यात दुष्काळस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. येत्या चार दिवसात पाऊस कोसळला नाही तर शेतकºयांची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.मोटारपंपाच्या पाण्यावरच रोवणीपरिसरात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही. काही शेतकऱ्यांनी पंपाद्वारे पाणी करून रोवणी केली आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपायला येत आहे. तरी सरासरीही पाऊस पडला नाही. परिणामी या परिसरातील शेतकरी रोवणीसाठी सद्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवत्या व पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. परंतु अगदी प्रारंभापासुनच पावसाने आपला लहरीपणा दाखविणे सुरू केले आहे. संपत चाललेल्या पावसाच्या या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस पडलेला नाही.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती