शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

एका कॉलवर मिळते रूग्णाला मोफत रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अनेक रूग्णालयातील वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देयुवकांचा समाजोपयोगी उपक्रम : ‘स्वप्नपूर्ती’ रक्तसेवा व्हॉट्सअ‍ॅपग्रुप रूग्णांना वरदान

राजेश बारसागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : रक्तदानाअभावी कुणाचाही जीव जावू नये, या तळमळीने नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील विकास घनशाम बोरकर या युवकाच्या संकल्पनेनुसार ‘स्वप्नपूर्ती’ रक्तसेवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. गरजुंना या ग्रुपवर संदेश पाठविल्यास एका कॉलवर रूग्णाला मोफत रक्त पुरवठा करतो. या उपक्रमामुळे आतापर्यंत शेकडो रूग्णांना जीवनदान मिळाले आहे.पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अनेक रूग्णालयातील वस्तुस्थिती आहे. याचा अभ्यास करून गरीब, गरजू, सामान्य रूग्णांना वेळीच रक्ताची निशुल्क मदत व्हावी सावरगाव, मांगरूड, तळोधी, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी आदी गावातील मित्र व जागरूक युवकांना एकत्र करून विकासने २४ मे २०१९ रोजी ‘स्वप्नपूर्ती रक्तसेवा’ या समाजोपयोगी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. यासाठी सचिन दिवाकर निकुरे, अनिल शेंद्रे, रोहित अंडेलकर, अनिल बोरूले, भारत चुनारकर आदी युवकांनी मोलाची मदत केली. स्वप्नपूर्तीच्या रुग्णसेवेला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. या माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सुमारे ४०० हुन अधिक रुग्णांना निशुल्क रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. गरजुंच्या सेवेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, हे या ग्रुपचे ब्रीद आहे.शेकडो रुग्णांना मदतआतापर्यंत शेकडो रूग्णांचे प्राण वाचविण्यात या ग्रुपला यश आले. प्रत्येक सदस्य ध्येयानुसार योगदान देतो. चंद्रपूर, भद्रावती, यवतमाळ, नागपूर गडचिरोली, वर्धा, आरमोरी, ब्रह्मपुरी येथील अन्य आठ ते दहा ग्रुप स्वप्नपूर्ती रक्तसेवा ग्रुपशी जोडण्यात आले. त्यामुळे विदर्भातून कुठल्याही गरजूला रक्ताची मदत अगदी एक ते दीड तासात उपलब्ध होते. या ग्रुपमध्ये २०० हून अधिक रक्तदाते जुळली आहेत.स्द्यस्थितीत कुणीही, कुठल्याही गरीब गरजू रुग्णांकरिता रक्त हवे असल्यास कॉल करून मदत मिळविता येते. संपर्क झाल्यानंतर कुठल्याही खासगी किंवा शासकीय रुग्णालयात एक ते दीड तासात रक्त उपलब्ध करून दिल्या जात आहे. मी आतापर्यंत २३ वेळा रक्तदान केले. कोविडच्या काळातही ही सेवा सुरूच आहे.- विकास बोरकर, स्वप्नपूर्ती रक्तसेवा, सावरगावता. नागभीड

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी