शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या वेळापत्रकाकडे पालकांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यांना खासगी विनाअनुदानित, कायम विना अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी पहिल्यादांच ऑनलाईन प्रकीया राबविण्यात आली. फेबु्रवारी महिन्यातच सोडत काढण्यात आली असली तरी प्रवेशासाठी मात्र मुहूर्त काढण्यात आला नाही.

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रीया खोळंबली : पालकांमध्ये धाकधूक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून हिरवी झेंडी देण्यात आली. यापूर्वीच विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने स्थानिक स्तरावरील प्रवेश वेळापत्रकांकडे पालकांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक निश्चित करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे.वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यांना खासगी विनाअनुदानित, कायम विना अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी पहिल्यादांच ऑनलाईन प्रकीया राबविण्यात आली. फेबु्रवारी महिन्यातच सोडत काढण्यात आली असली तरी प्रवेशासाठी मात्र मुहूर्त काढण्यात आला नाही. संपूर्ण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर कोरोना तसेच लॉकडाऊनचा परिणाम दिसून आला. त्यामुळे पालकांमधील अस्वस्थता चांगलीच वाढली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १९७ शाळा ऑनलाईन प्रवेशासाठी पात्र ठरल्या असून एक हजार ८०७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल चार हजार ४१४ ऑनलाईन अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ७४२ विद्यार्थ्यांची सोडतीव्दारे निवड करण्यात आली. लॉकडाऊनमुळे आरटीई सोडतीमध्ये निवड झाली मात्र प्रवेश प्रक्रीया रखडली. त्यामुळे पालकांमध्ये धाकधूक पसरली होती. दरम्यान शासनाने प्रक्रियेला हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे सर्व पालकांची वेळापत्रकांकडे नजरा लागल्या आहेत.संस्थांना प्रतिपूर्तीच्या रक्कमेची प्रतीक्षालॉकडाऊ नमुळे सर्वत्र अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे. शासनाचे कुठलेही अनुदान न घेता चालणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अतिशय अडचणीत आहेत. शिक्षणहक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाच्या प्रतिपूर्तीचे तीन वर्षाचे करोडो रूपये जिल्ह्यातील संस्थांचे थकीत आहेत.आर्थिक अडचणीमुळे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन शाळा व्यवस्थापन कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षाच्या ४० ते ५० टक्के फी पालकांकडून येणे बाकी आहे. त्यामुळे गाड्यांचे हप्ते इमारत भाडे, वीजबिल, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व चालकांचे पगार थकले आहे. त्यामुळे आरटीईचा थकीत परतावा, त्वरीत द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Schoolशाळा