शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सच्या कामासाठी नगरसेवकांना दिली होती पाकिटे

By admin | Updated: July 27, 2014 00:02 IST

चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या १०० टॉवर उभारणीचा आणि केबलिंगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या १०० टॉवर उभारणीचा आणि केबलिंगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी नगरसेवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे आणि प्रशांत दानव यांना मानहानीचा नोटीस दिला होता. त्यावर या तीन नगरसेवकांनी दिलेल्या उत्तरात कामाच्या परवानगीसाठी नगरसेवकांना मोठ्या रकमेची पाकिटे दिल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.७ जुलैला नगरसेवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे आणि प्रशांत दानव यांच्यासह काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना एक निवेदन दिले होते. त्यात, अकोला मनपाने ४० किलोमीटरच्या परिसरात केबल पसरविण्यासाठी रिलायन्स जीओ कंपनीकडून १२ कोटी १५ लाख ९६ हजार १४२ रूपये जमा करण्यात आले होते. मात्र चंद्रपुरातील ३६ किलोमीटर परिसरात केबल पसरविण्यासाठी आणि १०० टॉवरच्या उभारणीसाठी फक्त ३ कोटी ५० लाख रूपये जमा करण्यात आल्याचे या निवदेनातून म्हटले होते. त्यानंतर या आशयाच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्या होत्या. या बातम्यांमुळे आपली मानहानी झाल्याचा आरोप करणारा नोटीस महापौर संगीता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी आणि स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी यांनी प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे आणि प्रशांत दानव या तिघांवर ९ जुलैला बजावला होता. त्यावर २३ जुलैला या तिन्ही नगरसेवकांनी उत्तर दिले आहे. या उत्तरातील मुद्यांमुळे बरीच खळबळ उडाली असून पुन्हा नवा वाद उभा होण्याची शक्यता आहे.या उत्तरामध्ये म्हटल्याप्रमाणे, मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक लाभासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग करून कंपनीला काम दिल्याचा आरोप केला आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी एक लाख, ५० हजार, २५ हजार रुपयांची पाकीटे बऱ्याच नगरसेवकांना दिल्याचाही खळबळजनक आरोप केला आहे. मात्र ही पाकीटे प्रविण पडवेकर, प्रशांत दानव व काही नगरसेवकांनी स्थायी समिती सभापतींच्या कक्षात जाऊन परत केल्याचे म्हटले आहे.कंपनीशी हातमिळवणी करून नगरसेवकांना लाच देण्याचा प्रकार असल्याचा आरोप उत्तराच्या नोटीसमधून करण्यात आल्याने या प्रकरणातील गांभीर्य आता वाढले आहे. अन्य नगरसेवकांवर दडपण येण्याची शक्यता असल्याने आताच त्यांची नावे उघड करू शकत नाही. मात्र त्या नोटीसप्रमाणे न्यायालयीन कारवाई केल्यास त्या कारवाईत अन्य नगरसेवकांना दिलेल्या पाकीटांचा आणि नावांचा खुलासा करु, असेही उत्तरात म्हटले आहे. मनपा पदाधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार जनतेच्या नजरेत येऊ नये यासाठी आपणास खोटा नोटीस दिल्याचा दावाही त्यांनी केला केला आहे.२९ मे रोजी झालेल्या आमसभेत नगरसेवकांना रिलायन्स कंपनीसाठी उभारले जाणारे १०० टॉवर आणि त्याच्या रेडिएशनमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची कल्पना दिली नव्हती. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि संबंधित विभागाकडून यासाठी मनपाने सर्व्हेक्षण करायला हवे होते. मात्र तसे न करता व त्यावर कसलीही चर्चा न करता ठराव पारित केल्याचा आरोप या उत्तरात करण्यात आला आहे. ३० जुनच्या आमसभेत या ठरावाला ५० ते ५५ नगरसेवकांनी प्रखर विरोध दर्शवून या कंपनीशी झालेल्या कराराला विरोध दर्शविला होता. जनहितासाठी आपली विरोधाची भूमिका होती, असेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)