गोवर रुबेला सिटी टास्क फोर्स समितीची बैठक बुधवारी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गोवर रुबेला निर्मूलन मोहिमेत आजवर झालेल्या कामांचा आढावा घेऊन कामांच्या नियोजनावर चर्चा करण्य ...
येथील बहुउद्देशीय गुरव समाज समितीच्या वतीने गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणाऱ्या दुचाकीने ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता वरोरा-वणी मार्गावर शेंबळ शिवारात घडली. घटनेनंतर ट्रकला आगही लावण्यात आली. ...
व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांन ...
पडोली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नाकाबंदी करुन ७० पेट्या दारु व चारचाकी वाहन, असा एकूण १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारा करण्यात आली. ...
विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १५ दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली असून चार लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे,..... ...
वर्धा जिल्ह्यातील सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाने जिल्ह्यातील रूग्णांसाठी मंगळवारी व गुरूवार असे दोन दिवस भद्रावती येथून मोफत रूग्ण बससेवा सुरू केली. आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार करण्यासाठी ...
पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले. ...
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थी भीमराव गावडे याचा बुधवारी अकस्मात मृत्यू झाला. याची माहिती जिल्ह्यात पसरताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात एकच ...