शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

कापूस महामंडळाकडून दोनच खरेदी केंद्र प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

अकोला विभागातंर्गत जिल्ह्यात भद्राती, राजुरा ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिनिंगकडून १९ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव ही मागवण्यात आले आहे. परंतु यावर्षी मोजकीच केंद्र्रे सुरू करण्यात येत असल्याने कापूस खरेदीची कोंडी होण्याची शक्यता आहे. केंद्र्र सरकारने निश्चित केलेल्या हमी भावाप्रमाणे कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाअंतर्गत अनेक ठिकाणी खरेदी केली जायची.

ठळक मुद्देपुढील हंगामातील कापूस खरेदी : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

जयंत जेनेकर।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : भारतीय कापूस महामंडळ अंतर्गत पुढील हंगामातील कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्राची निविदा काढण्यात आली. खरेदी केंद्रांअभावी मागील हंगामातील कापूस पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरात अडून होता. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही अनेक अडचणीना सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.अकोला विभागातंर्गत जिल्ह्यात भद्राती, राजुरा ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिनिंगकडून १९ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव ही मागवण्यात आले आहे. परंतु यावर्षी मोजकीच केंद्र्रे सुरू करण्यात येत असल्याने कापूस खरेदीची कोंडी होण्याची शक्यता आहे. केंद्र्र सरकारने निश्चित केलेल्या हमी भावाप्रमाणे कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाअंतर्गत अनेक ठिकाणी खरेदी केली जायची. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना हमीभावाच्या दृष्टीने सोयीचे होते. परंतु ही खरेदी न झाल्यास हमीभाव मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना धूसर होताना दिसत आहे. खासगी जीनिंगधारकाकडून शेतकºयाचा कापूस कवडीमोल भावात खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरपना, वरोरा, राजुरा, भद्रावती, चिमूर, चंद्रपूर, जिवती, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. यातही कोरपना व वरोरा तालुके दर्जात्मक कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे किमान दोन तालुक्यात सीसीआयची खरेदी होणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्व विदर्भातील या दोन्ही मोठ्या कापूस बाजारपेठ असल्याने दरवर्षी कापूस विक्रीला येतो. मात्र, केंद्रांअभावी शेतकºयांना ताटकळत राहावे लागते.विभागीय कार्यालयाने फेरविचार करावासीसीआयकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्याने अकोला विभागातंर्गत अनेक केंद्रांची पुढील हंगामासाठी कपात करण्यात आली. मात्र, भारतीय कापूस महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने फेरआढावा घेऊन संकलन केंद्रांची संख्या वाढवावी. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली. खरेदी केंद्रांची संख्या वाढली नाही तर यंदाही शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती