शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट कारखान्यातील अपघाताची ऑनलाईन चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

एसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना जिल्हातील पहिला कारखाना आहे. नऊ वर्षांपूर्वी या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. कारखान्याच्या सुरक्षेबरोबर कामगाराची सुरक्षाही येथे गांभीर्याने बघितली जाते, असे सांगितले जात असतानाच हा अपघात झाला. तांत्रिक त्रृटीमुळे अपघात घडला काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकारखाना एक महिना होता बंद

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील एसीसी चांदा सिमेंट कारखान्यातील सिमेंट उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या क्लिंकर सायलोच्या हापरमध्ये शेड कोसळल्याने सिमेंट उत्पादनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. घटनेची चौकशी केल्यानंतर कारण समोर येणार आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सदर चौकशी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.एसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना जिल्हातील पहिला कारखाना आहे. नऊ वर्षांपूर्वी या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. कारखान्याच्या सुरक्षेबरोबर कामगाराची सुरक्षाही येथे गांभीर्याने बघितली जाते, असे सांगितले जात असतानाच हा अपघात झाला. तांत्रिक त्रृटीमुळे अपघात घडला काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.नैसर्गिक आपत्ती आली नसतानाही अचानक ही घटना घडली कशी, याचे चिंतन आता अधिकाऱ्यांकडून होत आहे. चौकशीअंती घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.चौकशी अंती काही अधिकाऱ्यांवर गदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र सध्या लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने ही चौकशी ऑनलाईन व्हिडीओ शुटींग व व्हीसीच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच ही चौकशी सुरू होणार आहे.कारखाना एक महिना होता बंदएसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना लॉकडाऊन काळात एक महिना बंद होता. त्या काळात कारखान्याचे सयंत्राच्या साफसफाईचे काम सुरू होते. शासनाने सिमेंट उघोगांना काही अटीवर कारखान्याचे उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आणि आजच्या घडीला सिमेंट उत्पादन सरासरी ९० टक्के होत असताना बुधवारी दुपारी अचानक क्लिंकर सायलोवरील टिनेचे मोठे शेड सायलोत कोसळले. सदर घटनेमुळे पूर्ववत सिमेंट उत्पादन सुरळीत होण्यासाठी दोन महिने लागणार असल्याचे समजते.

टॅग्स :Accidentअपघात