११ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:31+5:302021-06-09T04:35:31+5:30

भद्रावती : नागपूर - चंद्रपूर मुख्य मार्गावरील टप्पा परिसरात अवैध दारूची वाहतूक करीत असणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन त्या वाहनातील ...

One arrested with Rs 11 lakh | ११ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

११ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

भद्रावती : नागपूर - चंद्रपूर मुख्य मार्गावरील टप्पा परिसरात अवैध दारूची वाहतूक करीत असणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन त्या वाहनातील दारूसाठ्यासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी दुपारच्या दरम्यान करण्यात आली.

धनराज सखाराम बावणे (४०, रा. जलनगर, चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. तो आपल्या चारचाकी वाहनाने (एम. एच. ०२, जेपी ७९४०) नागपूरहून चंद्रपूरकडे देशी दारूची वाहतूक करीत असल्याबाबतची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता ही नाकाबंदी पाहून आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या वाहनातील विदेशी दारू साठ्यासह ११ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. यातील आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अमोल तुळजेवार, शशांक बदामवार, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे यांनी केली.

Web Title: One arrested with Rs 11 lakh