शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी टिळकवाडी येथील संपर्कातील एकाच कुटुंबातील चवथा १८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी हैद्राबाद येथून प्रवास केल्याची नोंद आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ५६ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चेन्नई येथून आलेल्या पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील हे गृहस्थ असून त्यांना श्वसनाचा त्रास होता.

ठळक मुद्देनवे रुग्ण १५ : १९५ बाधितांना लक्षणे नसल्याने सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ३०९ बाधितांची संख्या होती. बुधवारी त्यामध्ये १५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३२४ झाली आहे. यापैकी १९५ बाधितांना उपचारानंतर कोरोना आजाराचे कोणतेही लक्ष नसल्याने सुटी देण्यात आली आहे. तर सध्या जिल्ह्यात १२९ बाधितांवर उपचार सुरू आहे.जिल्ह्यात बुधवारी पुढे आलेल्या रुग्णांमध्ये वरोरा तालुक्यातील हादगाव येथील २५ वर्षीय युवतीचा समावेश आहे. पुणे येथून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. युवती आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होती. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील एकाच कुटुंबातील चवथा सदस्य असणाऱ्या १८ वर्षीय युवकाचा स्वॅबदेखील पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी येथील एकाच कुटुंबातील तिघांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे.बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी टिळकवाडी येथील संपर्कातील एकाच कुटुंबातील चवथा १८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी हैद्राबाद येथून प्रवास केल्याची नोंद आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ५६ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चेन्नई येथून आलेल्या पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील हे गृहस्थ असून त्यांना श्वसनाचा त्रास होता. भद्रावती येथील एकता नगर परिसरातील ५९ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मध्यप्रदेशातील बैतूल येथून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. आल्यापासून ते संस्थात्मक अलगीकरणात होते. भद्रावती येथील डिफेन्स कॉलनीमध्ये राहणारे ४४ वर्षीय गृहस्थ उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथून प्रवास करून आले होते. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.गडचांदूर येथील बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी दहा वर्षीय मुलीचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. उत्तर प्रदेशातील फत्तेपूर येथून प्रवास करून आल्याची नोंद आहे. गडचांदूर येथील चालक असलेले ३५ वर्षीय गृहस्थ पॉझिटिव्ह ठरले. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने तपासणी करण्यात आली होती. अंबुजा सिमेंट उपरवाही येथील ४२ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगणा प्रदेशातून प्रवास केल्याची नोंद असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. गडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक ४ मधील ७१ वर्षीय, ३१ वर्षीय व याच वार्डातील माणिकगड सिमेंट फॅक्टरीमध्ये काम करणाºया २५ वर्षे युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघांनाही संपर्कातून संसर्ग झाला असल्याचे पुढे आले. अमरावती येथून प्रवास करून आलेल्या शेजाºयाच्या संपर्कात आलेले हे बाधित आहेत.याशिवाय वरोरा येथील व्होल्टाज सागर कॉलनी येथील ४० वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असून आल्यापासून ते संस्थात्मक अलगीकरणात होते. भद्रावती शहरातील टिळक नगर परिसरातील १४ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. हैदराबाद येथून आलेल्या कुटुंबाच्या अन्य सदस्यांच्या संपर्कातील ही मुलगी आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील २८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. रानबोथली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहे.सावधान, संपर्कातून होत आहे बाधाचंद्रपूर शहरांमध्ये सध्या २६ जुलैपर्यंत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. बुधवारी पुढे आलेल्या १५ बाधितांमध्ये संपर्कातून बाधित झालेल्या पॉझिटिव्हची संख्या अधिक आहे. गडचांदूर येथेदेखील संपर्कातून सहा बाधित पुढे आले आहे.त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच स्वत:साठी स्वत:च्या कुटुंबासाठी व एकूणच समाजासाठी बाहेरून कुठेही प्रवास केल्यास स्वत: पुढे येऊन चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या