आता वाढला कोरोनामुक्तीचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:24+5:30

रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे. नव्या बाधितांमध्ये चंद्रपूर -६५, बल्लारपूर-१५, चिमूर-एक, मूल-११, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-पाच, ब्रह्मपुरी-२२, नागभीड-११, वरोरा-२०, भद्रावती-१०, सावली-तीन असा समावेश आहे.

Now the speed of coronation has increased | आता वाढला कोरोनामुक्तीचा वेग

आता वाढला कोरोनामुक्तीचा वेग

ठळक मुद्देनव्या १८७ बाधितांची भर : १२,०७७ पैकी ८८४३ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर : मागील काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. सोबत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता रुग्णाच्या कोरोनामुक्तीचाही वेग वाढत आहे. दररोज शंभराहून अधिक रुग्ण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतत आहेत.
रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे.
नव्या बाधितांमध्ये चंद्रपूर -६५, बल्लारपूर-१५, चिमूर-एक, मूल-११, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-पाच, ब्रह्मपुरी-२२, नागभीड-११, वरोरा-२०, भद्रावती-१०, सावली-तीन असा समावेश आहे.

ग्रामीण भागातील बाधित
बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड, कळमना, गोकुळ नगर, साईबाबा वार्ड, विवेकानंद वार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, विद्यानगर, विसापूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विवेकानंदनगर, चुनाभट्टी वार्ड, बामणवाडा, गोवरी कॉलनी परीसर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील गांधिनगर, आनंदवन, बावणे लेआउट परिसर, अभ्यंकर वार्ड, चिनोरा, देशपांडे लेआउट, जिजामाता वार्ड, शांतीवन लेआउट परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विदर्भ टाउन परिसर,खंडाळा, ज्ञानेश नगर, देलनवाडी वार्ड, शांतीनगर, कुर्झा, मालडोंगरी,गुजरी वार्ड, शेष नगर, मेंढकी, खेड मक्ता भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी, झिंगोजी वार्ड, किल्ला वार्ड, शिवाजीनगर, श्रीकृष्णा नगर, बाजार वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपार, नवरगाव, लोनवाही, गुंजेवाही, पळसगाव, नांदगाव परिसरातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील कोजबी,ओवाळा, चावडेश्वरी, गिरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मूल तालुक्यातील जूनासुर्ला, राजगड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, पिंपळगाव, उपरवाही, माणिक गड कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे.

तीन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात रविवारी तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, सावली येथील ५२ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ७ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू भानापेठ वार्ड, चंद्रपूर येथील ६९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला १० ऑक्टोबरला भरती करण्यात आले होते. तर, तिसरा मृत्यू सौगत नगर तुकुम, चंद्रपूर येथील ५९ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे.

चंद्रपूर परिसरातील ६५ नवे बाधित
चंद्रपूर शहर व परिसरात रविवारी नवे ६५ बाधित आढळून आले. हे बाधित अंचलेश्वर वॉर्ड, संजय नगर, नगीनाबाग, रयतवारी कॉलनी परिसर, भानापेठ वार्ड, शक्तिनगर, बाबूपेठ, लालपेठ कॉलरी परिसर, संत नगर दुर्गापूर, तुकूम, वैशाली नगर, भिवापूर वॉर्ड, जटपुरा गेट, सिंधी कॉलनी परिसर, रामनगर, कृष्णा नगर, इंदिरानगर भागातील आहेत.

Web Title: Now the speed of coronation has increased