निवडणूक काळात साडेनऊ लाखांची मुद्रांक विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:18+5:302021-02-05T07:34:18+5:30

नागभीड : डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या दोन महिन्यांत येथील कोषागारातून साडेनऊ लाख रुपयांची मुद्रांक विक्री झाली. विक्री ...

Nine and a half lakh stamp sales during the election period | निवडणूक काळात साडेनऊ लाखांची मुद्रांक विक्री

निवडणूक काळात साडेनऊ लाखांची मुद्रांक विक्री

नागभीड : डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या दोन महिन्यांत येथील कोषागारातून साडेनऊ लाख रुपयांची मुद्रांक विक्री झाली. विक्री झालेल्या या मुद्रांकांचा निवडणुकीच्या कामासाठी वापर झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

नागभीड तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या ४३ ग्रामपंचायतींच्या ३६३ जागांसाठी ८४० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यातील ६० उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्षात ७२४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना विविध प्रकारच्या शपथपत्रांची गरज पडली. या शपथपत्रांसाठी उमेदवारांना मुद्रांक खरेदी करावे लागले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२० पासून लागू झाली होती. मात्र प्रत्यक्षात नामांकन दाखल करण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर हा होता. नंतरही काही उमेदवारांनी प्रक्रिया पूर्ण केल्या. कोषागार कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात या कार्यालयातून ५ लाख १० हजार रुपयांचे तर जानेवारी या महिन्यात ४ लाख ४० हजार रुपयांचे मुद्रांक विकले गेले. विकल्या गेलेल्या या मुद्रांकांचा निवडणुकीच्या कामासाठी सर्वाधिक वापर झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Nine and a half lakh stamp sales during the election period