महावितरणने साधला ३२ हजार ग्राहकांसोबत थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:12+5:30

महावितरणने चंद्रपूर जिल्ह्यात ८१ तर गडचिरोली जिल्ह्यात ९८ वेबिनार घेतले. चंद्रपूर जिल्ह्यात ३३ ठिकाणी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ठिकाणी तक्रार निवारण मेळावे घेतले. महावितरणच्या चंद्रपूर विभागात २४, बल्लारशा विभागात १८, वरोरा ९ तर गडचिरोली आणि ब्रम्हपुरी विभागात प्रत्येकी ७, आलापल्ली विभागात ६ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले.

MSEDCL conducts direct communication with 32,000 customers | महावितरणने साधला ३२ हजार ग्राहकांसोबत थेट संवाद

महावितरणने साधला ३२ हजार ग्राहकांसोबत थेट संवाद

googlenewsNext
ठळक मुद्देवीज बिलाचा संभ्रम दूर केल्याचा दावा : सर्व कार्यालयात सुरु केले तक्रार निवारण कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना वीज बिल दिले. मात्र यासंदर्भात मोठ्या संख्येने ग्राहकांनी शंका उपस्थित केली. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील २५ हजार ४७१ ग्राहकांनी बिलासंदर्भात तक्रार केली. या तक्रांरीचे निरासरण करण्यासाठी महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहे.
वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह वेबिनारनही घेतले. या माध्यमातून महावितरणने चंद्रपूर आणि गडचिरोलीतील तब्बल ३२ हजार ग्राहकांसोबत संवाद साधला आहे.
महावितरणने चंद्रपूर जिल्ह्यात ८१ तर गडचिरोली जिल्ह्यात ९८ वेबिनार घेतले. चंद्रपूर जिल्ह्यात ३३ ठिकाणी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ठिकाणी तक्रार निवारण मेळावे घेतले. महावितरणच्या चंद्रपूर विभागात २४, बल्लारशा विभागात १८, वरोरा ९ तर गडचिरोली आणि ब्रम्हपुरी विभागात प्रत्येकी ७, आलापल्ली विभागात ६ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले. ग्राहकांकडून आलेल्या बहुतांश तक्रारी दूर करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. मीटर रिडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल वीज ग्राहकांना देण्यात आले. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करून शंका निरसन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे विविध गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-१९ संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याची माहितीही महावितरण दिली.

२५ हजारांवर तक्रारी
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणकडे अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. यामध्ये २५ हजार ४७१ नागरिकांनी वीज बिलासंदर्भात आपल्या तक्रारी केल्या.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणची माहिती देण्यासाठी ग्राहकांसोबत संवाद साधण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९ वॉट्सअ‍ॅप समूह तयार करून यातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सुनील देशपांडे,
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

Web Title: MSEDCL conducts direct communication with 32,000 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.