शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी स्वत: स्वयंपाक करून दिले गरजूंना जेवणाचे डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

कोरोनामुळे संपूर्ण देशात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या पोटालादेखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहिला काँग्रेसचा मदतीचा एक घास बनेल पोटाचा आधार : प्रतिभा धानोरकर

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या पोटाला चिमटा बसत आहे. कोरोना काळात आरोग्याच्या चिंतेसोबतच अनेकांना पोटाची चिंता लागली आहे. ही बाब हेरून प्रदेश महिला काँग्रेसने ‘एक घास मदतीचा’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात वरोरा काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वत: हातात पोळपाट-बेलणे घेऊन स्वयंपाक केला आणि या जेवणाचे डबे गरजूंना दिले. महिलांनी पुढे येऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.कोरोनामुळे संपूर्ण देशात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या पोटालादेखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मदत करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाची सुरुवात झाली. वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेत स्वतः स्वयंपाक करून गरजू लोकांना डबे दिले. काँग्रेसच्या सर्व महिलांनी पुढे येऊन उपकरणात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. या माध्यमातून गरजूंपर्यंत अन्न पोहोचविले जाणार आहे.

महिला भगिनींनी घरातील मंडळींचा स्वयंपाक करताना त्यात अधिकच्या दहा पोळ्या कराव्यात. पावभर भाजी जास्त करावी. अशाप्रकारे ४०-५० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला, तर सुमारे ४०० ते ५०० पोळ्या तयार होतील. हे अन्न आम्ही महिला काँग्रेसच्यावतीने गरजूंना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात मोठे यश येईल, अशी आशा आहे.- प्रतिभा धानोरकर, आमदार, वरोरा विधानसभा मतदार संघ.

 

टॅग्स :MLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या