शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आई-वडिलांच्याच उपस्थितीत पार पडताहेत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

मार्च ते मे दरम्यान बहुतांश विवाह होतात. मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे २१ मार्चंपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. तसेच विषाणूजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. पाच लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयाचा व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्यांना फटका तर बसलाच शिवाय ज्यांची लग्न मार्च महिन्याच्या शेवटी, एप्रिल महिन्यात होती त्यांनाही बसला.

ठळक मुद्देकोरोना दहशत: तारीख निश्चित असल्याने कुटुंबीयांचा नाईलाज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लग्न सोहळ्यांसह धार्मिक कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सूचना शासन तसेच प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे. मात्र काही कुटुंबीयांनी लग्नाची तारीख निश्चित केल्यामुळे ठरलेल्या तारखेत केवळ आई-वडील तसेच दोन-चार नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडत आहे. यामध्ये कुठेही गाजावाजा न करता लग्न कार्य उरकण्यात येत आहे.मार्च ते मे दरम्यान बहुतांश विवाह होतात. मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे २१ मार्चंपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. तसेच विषाणूजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. पाच लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयाचा व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्यांना फटका तर बसलाच शिवाय ज्यांची लग्न मार्च महिन्याच्या शेवटी, एप्रिल महिन्यात होती त्यांनाही बसला. काही महिन्यांपूर्वीच दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने तारीख निश्चित झाली. काहींनी तर पत्रिकासुद्धा वितरीत केल्या. दोन्ही नवदाम्पत्य भ्रमणध्वनीद्वारे लग्न प्रसंगाची स्वप्ने रंगवू लागली. पण कोरोनासारखा विषाणूने सर्व नियोजन व स्वप्नावर पाणी फेरले. अशा परिस्थितीमध्ये तारीख निश्चित झालेल्यांपैकी काहींनी तारीख पुढे ढकलली तर काहींनी संचारबंदी, जमावबंदी अजून किती दिवस राहील, याबाबत अनिश्चितता असल्याने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न उरकुन घेत असल्याचे चित्र आहे. कुठलाच गाजावाजा न करता गुपचूप घरातल्या घरात लग्न लावल्या जात आहे. काही ठिकाणी तर मुलगा किंवा मुलीचा मामा किंवा अन्य अगदी जवळचे नातेवाईक प्रवेशबंदीमुळे लग्न सोहळ्यांना उपस्थित राहू शकत नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न