शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा ...

ठळक मुद्देरांगोळी काढून मतदारांचे स्वागतआबालवृद्धांसह तरुणांनीही बजावला प्रथमच अधिकारमतदार करणाऱ्यांमध्ये उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा उत्सव असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये आबालवृद्धांसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे, प्रथमत: मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता बघायला मिळाली. लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी दिव्यांग, अंध मतदारांनीही आपला हक्क बजावला. मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्साहात काही त्रुट्याही होत्या. यावर काही मतदारांनी संतापही व्यक्त केला.२४ तासात मतदारांनी केले ९०६ कॉलचंदपूर : लोकसभा मतदानासाठी मतदारांची तारांबळ उडू नये यासाठी प्रशासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनचा अनेक मतदारांनी आधार घेतला. विशेष म्हणजे, मागील २४ तासामध्ये तब्बल ९०६ जणांनी या हेल्पलाईवर फोन करून आपल्या नावाची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, गुुरुवारी मतदानाच्या दिवशी ३६३ कॉल १९५० या हेल्पलाईनवर आल्याची माहिती जिल्हा मदत केंद्राचे सहाय्यक संजय डांगे यांनी दिली.एक तास उशिराने सुरु झाले मतदान केंद्रचंद्रपूर येथील १६५ क्रमांकाचे माऊंट कॉन्व्हेंट मतदान केंद्र सुरु होताच इव्हीमशीमध्ये बिघाड आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ती मशीन जिल्हा कार्यालयाला पाठवून दुसरी मशीन मागविली. त्यामुळे या केंद्रावरील मतदान तब्बल एक तास उशिराने सुरु करण्यात आले. तर रामनगर येथील मतदार केंद्रावरही मतदारांमध्ये गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.मतदारही अपडेट नाहीमागील काही महिन्यांपूर्वीपासून जिल्हा प्रशासनाने मतदान यादीत नाव नोंदविण्याची मोहीम हाती घेतली होती. एवढेच नाही तर नाव, पत्ता, गाव आदींच्या दुरुस्तीसाठीही मतदारांना आवाहन केले. मात्र यावेळी बहुतांश मतदारांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आहे त्याच स्थितीत मतदार याद्या पुन्हा प्रकाशित झाल्याने हा गोंधळ उडाला. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर मतदारांनी माहिती जाणून घेतली असती तर मनस्ताप झाला नसता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019