शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; तीनही प्रमुख उमेदवारांच्या गोटात विजयाचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:54 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगले होते.

ठळक मुद्देमतदानासोबतच रंगू लागल्या निकालाच्या चर्चा : मात्र कुणालाही ठामपणे सांगता येईना !

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगले होते. कुठे भाजप, कुठे काँग्रेसच जिंकेल असा सूर होता. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीही गठ्ठा मते घेण्याची चर्चा होती. मात्र कुणीही एकावर ठाम दिसत नव्हते. कोणताही पक्ष जिंकला तरी मताधिक्य मात्र कमी असल्याचेही बोलले जात होते. यावरून ही निवडणूक काट्याची झाल्याचा अंदाज येत होता.लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच मतांची गणिते मांडणे सुरू होते. काँग्रेसने तगडा उमेदवार मैदानात उतरविल्यास भाजपसमोर कडवे आव्हान उभे करता येणे शक्य आहे, असा सूर होता. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून दररोज नवे नाव समोर येत होते.यामुळे काँग्रेसश्रेष्ठी उमेदवाराबाबत ठाम नसल्यामुळे मतदार संभ्रमात पडले होते. चर्चेत नसताना अचानक विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे आले. या नावारून जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आली. आशिष देशमुख, विनायक बांगडे यांची नावे चर्चेत होतीच. मुत्तेमवार यांचे नाव मागे पडून अचानक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनायक बांगडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. बांगडे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र ते अल्पकाळाचे ठरले. विशाल मु्त्तेमवारांसारखाच बांगडे यांच्या नावालाही कडवा विरोध झाला. अखेर सुरूवातीपासून काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून असलेले सुरेश धानोरकर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब करीत बांगडे यांचे नाव यादीतून वगळले. यामुळे बांगडे यांच्याशी जुळलेला एक मोठा गट नाराजीचा सूर काढत राहिला. अखेरच्या क्षणापर्यंत ही नाराजी कायम होती. प्रचारातही एक गट कायम अंतर ठेवून होता.दुसरीकडे भाजप पूर्ण ताकदीनिशी प्राचारात उतरली होती. दुसरीकडे राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे हंसराज अहीर यांच्या बाजूने खिंड लढवत होते. यासोबतच भाजपने काही स्टार नेत्यांच्याही मतदार संघात सभा घेतल्या. काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय दुसऱ्या मोठ्या नेत्याची सभा या मतदार संघात घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्यासाठी जंगजंग पछाडत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी सुरूवातीला धिम्म्या गतीने प्रचार सुरू केला खरा, परंतु प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून आले. त्यांचा कॅडर तन-मन-धनाने प्रचारात गुंतला होता. बारा दिवसातील प्रचाराच्या काळात हे तीनच उमेदवार या ना त्या कारणाने चर्चेत होते.अन्य उमेदवार प्रचारात आणि जनतेच्या चर्चेतही दिसले नाही. ही निवडणूक या तीनच उमेदवारांसभोवताल फिरत होती. ग्रामीण व शहरी भागाचा अंदाज घेतला असता ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बोलले जात होते. शहरी भागातही हेच चित्र होते. वंचित बहुजन आघाडीही चमत्कारीत मते घेतील, असा सूर काही ठिकाणी ऐकायला मिळाला.वंचित बहुजन आघाडीने जितकी जास्त मते घेतली त्याचा थेट फायदा भाजपला होईल, असेही चर्चेतून पुढे येत होते. तीनही उमेदवारांच्या गोटात डोकावून बघितले असता प्रत्येकच पक्ष विजयाचा दावा करीत आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने मतांची गोळा-बेरीज करून विजयाचे गणित पटवून देत आहेत.मात्र एकूणच दिवसभराच्या माहोलवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मतांची कडवी झुंज होणार असल्याचे चित्र आहे. पैकी एकाचा कमी फरकाने का होईना विजय होईल, असे चित्र आहे. निकालासाठी आणखी बराच काळ वाट पहावी लागणार असल्यामुळे ही गणिते दिवसागणिक बदलणार हे मात्र नक्की. कोणाचे गणित बरोबर आणि कोणाचे चुकले हे निकालाअंती कळणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019