शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लिकर लॉबी पुन्हा मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली नाही. मुंबई, दिल्लीपर्यंत या संघटनांनी वाऱ्या केल्या.

ठळक मुद्देमोर्चेबांधणी सुरू : दारूबंदी उठविण्यावर जिल्हाभर जोरदार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठविणार असल्याचे अनौपचारिक संकेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देताच जिल्ह्यात या विषयावर आता जोरदार रणकंदन सुरू झाले आहे. दरम्यान, तब्बल सहा वर्षानंतर अचानक आशा पल्लवित झाल्याने जिल्ह्यातील लिंकर लॉबी पुन्हा मैदानात आली असून त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली नाही. मुंबई, दिल्लीपर्यंत या संघटनांनी वाऱ्या केल्या. एवढेच नाही तर न्यायालयाचे दारही ठोठावले. मात्र न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास नकार देत दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मात्र लिंकर लॉबीचे आव्हान संपुष्टात आले. पाच वर्ष दारूबंदी कायम राहिली.दरम्यान, जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैध दारूचा महापूर आहे. बोगस दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दारूबंदीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उठवायची होती. परंतु सध्यास्थितीत कोरोना महामारी असल्याने दारूबंदी उठविण्यास विलंब होत आहे. आपण कोणत्याही आंदोलनाला घाबरणार नाही. येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविणार असल्याचे अनौपचारिकरित्या सूतोवाच ना. वडेट्टीवार यांनी चिमुरात दोन दिवसांपूर्वी केले. ना. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे आतापर्यंत तलवार मॅन करून बसलेली लिंकर लॉबी पुन्हा मैदानात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी करीत वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणीत ही लॉबी सध्या व्यस्त दिसत आहे.बारच्या जागेवर हॉटेल्सदारूबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व बिअर बार, वाईन शॉपला टाळे लागले. काही महिन्यांपर्यंत ते तसेच होते. मात्र दारूबंदी उठविण्यात न आल्याने अनेकांनी बिअर बारच्या जागेवर कोणताही बदल न करता हॉटेल्स सुरू केले. आज ना उद्या दारूबंदी उठेल या आशेवरच त्यांनी बिअर बारची इतर व्यवसायासाठी तोडफोड केली नसावी, असेच दिसून येते.निवडणुकीतही गाजला मुद्दालोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावर मोठ्या प्रमाणात रणकंदन झाले. त्यानंतर काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही चंद्रपूरच्या दारूबंदीवर चर्चा झाली. एवढेच नव्हे तर उमेदवारांच्या भाषणांमधून दारूबंदीवर वक्तव्ये झालीत. यातून मतदारांचा कानोसा घेण्यात आला होता.