शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तालुक्याला या सुविधांबाबतीत भेदभाव करत असल्याची आरोप नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांमध्ये चिंता : माणिकगड-भेंडावी मार्गावर आली झाडेझुडपे

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यातील माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मार्गाच्या बाजुला झाडेझुडुपे व वेली वाढल्या आहेत.झाडांच्या फाद्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. वळणाच्या ठिकाणी सामोरील वाहने दिसत नसल्याने अपघाताची भीती असते. साईडपट्ट्या नसल्याने समोरून वाहन आल्यावर वाहन कोणी खाली उतरावयाचे यावरूनही बऱ्याचदा वाद होतात.तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तालुक्याला या सुविधांबाबतीत भेदभाव करत असल्याची आरोप नागरिकांनी व्यक्त केली आहे. जिवती ते गडचांदूर (माणिकगड मार्ग) आणि पाटण ते गडचांदूर (भेंडावी मार्ग) या रस्त्याच्या देखभालची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागकडे आहे. झाडे झुडुपे व वेली वाढल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यावर मोठी अडचण निर्माण होते. जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरूंद असल्याने झाडांमुळे अपघात होऊ शकतो.जिवती तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली. रुंदीचे रस्ता नसल्याने पाटण, जिवती तालुक्यातील नागरिक व कर्मचाऱ्यांना दररोज जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. ही समस्या सोडविण्याची गरज आहे.-कंटू कोटनाके, जिवती

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक