शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST

सास्ती : शिशिर ऋतूच्या काळात पानगळ सुरू होऊन साऱ्या सृष्टीला एक प्रकारची मरगळ आल्याचा भास होतो. अशातच शिशिरानंतर वसंतऋतूचे ...

सास्ती : शिशिर ऋतूच्या काळात पानगळ सुरू होऊन साऱ्या सृष्टीला एक प्रकारची मरगळ आल्याचा भास होतो. अशातच शिशिरानंतर वसंतऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटू लागते. हा आनंददायी ऋतुबदल चैत्रात घडतो. याच कालावधी जंगलात टेंभरं, खिरण्या, चारबिया सारख्या विविध प्रकारचे निसर्गाचा गोडवा असलेली फळे पूर्वी बाजारात विक्रीला यायची. परंतु हायटेक जीवनमानामुळे या जंगली फळांची जागा मात्र आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावी पिढीला याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. परिसरात निसर्गरम्य वातावरण असून येथील रानावनात बहुउपयोगी वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या वनस्पतींसह रानातील रानमेवा असलेली विविध फळे या वनात आहेत. त्यात टेंभरे, चारबिया, खिरण्या, येरोन्या, काटबोरे, विलायती चिंचा, कवठ अशी विविध जंगली फळे आहेत. ही फळे बाजारात काही वर्षांपूर्वी विक्रीला राहत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा. त्यातून मोठी मिळकतही होत होती. परंतु आज होणाऱ्या जंगलतोडीमुळे किंवा जंगलात जंगली जनावरांच्या वावर वाढल्यामुळे ही फळे बाजारात येणे कठीण झाले आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी या फळांकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. कारण आज बाजारात विदेशातील फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाची देण असलेला रानमेवा दूर सारल्या जात आहे.

बॉक्स

पूर्वी शाळेसमोर लागायची दुकाने

पूर्वी शाळेसमोरही ही जंगली फळे विकल्या जात होती. शाळेतील मुले ही फळे मोठ्या आवडीने खात होती. परंतु आज या ठिकाणीसुद्धा फळांची जागा चॉकलेट व बिस्किटांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गाची देण असलेल्या व गोडव्याने तृप्त करून टाकणाऱ्या फळे देणाऱ्या त्या जंगलाबद्दल आपुलकीही भावी पिढीपासून दूर जाताना दिसून येत आहे.

बॉक्स

औषधीयुक्त गुणधर्म

ही सर्व जंगली फळे मानवाच्या आरोग्यास उपयुक्त असून यात मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त गुणधर्म आहेत. या फळांद्वारे जीवनसत्त्वे तथा पोषणमूल्य मिळते. अशा या उपयुक्त वनस्पती नष्ट होताना दिसून येत आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात होत असून या फळे देणाऱ्या वृक्षांचीही कत्तल होत आहे. तेंदूपत्ता संकलनात....... या टेंभराच्या झाडांची.......... पाने मोठ्या प्रमाणात तोडली जातात. त्यामुळे या झाडांची फळे दिसेनाशी झाली आहेत.