शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनचा पुरवठ्याअभावी फॅब्रिकेशन इंडस्ट्रीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यात फॅब्रिकेशन इंडस्ट्रीची व्याप्ती मोठी आहे. स्टील रेलिंगशी संंबंधित काही युनिट शहरात आहेत. लहान आकाराचे फॅब्रिकेशन युनिटही दीडशेच्या ...

चंद्रपूर जिल्ह्यात फॅब्रिकेशन इंडस्ट्रीची व्याप्ती मोठी आहे. स्टील रेलिंगशी संंबंधित काही युनिट शहरात आहेत. लहान आकाराचे फॅब्रिकेशन युनिटही दीडशेच्या आसपास आहेत. त्याशिवाय कुलर व आलमारी आदी बनविणाऱ्या फॅब्रिकेशनची युनिटची संख्याही बरीच आहे. या प्रकारच्या दुकानांची अधिक संख्या दिसून येते आहे. लहान मोठ्या आकारातील सर्व युनिटची कमी - अधिक प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. स‌द्यस्थितीत या प्रकल्पांना ऑक्सिजनचा शून्य पुरवठा आहे. त्यामुळे ऑक्सिजनशी संबंधित कामे बंद आहेत. फॅब्रिकेशन युनिट बंद पडले आहेत. ऑक्सिजन नसल्याने मूळ कामे सोडून इतर किरकोळ कामे सुरू आहेत. कटिंगसाठी प्रामुख्याने ऑक्सिजनचा वापर केला जातो. सध्या पुरवठा होत नसल्याने कामगारांवरही बेरोजगारीची वेळ आली. उत्पादन बंद असल्याने सुमारे दोन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्योगांना लागणाऱ्या कच्चा मालाचे दर वाढले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक वाढ स्टीलच्या दरांत झाली आहे. १५ ते ३० टक्के दरवाढ झाल्याने याचा वाईट परिणाम उ‌द्योगांवर झाला. ही दरवाढ सुरू राहिल्यास उद्योगांना काही काळासाठी युनिट बंद करावे लागतील. स्टील शिवाय रसायने, प्लास्टिक, ॲल्युमिनियमचे दरदेखील वाढत आहेत. मागील दोन महिन्यांत झालेली दरवाढ जीवघेणी ठरण्याची शक्यता उद्योग वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग आता कमी होत आहे. अशावेळी सरप्लस ऑक्सिजन उद्योगांना पुरविण्याची तयार प्रशासनाने करावी, अशी मागणी चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी केली.