मजुरांकडून जि. प. शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:06+5:30

रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात झाडांची संख्या भरपूर असल्याने पालापाचोळा पसरला होता.

From the laborers, Dist. W. Transformation of the school | मजुरांकडून जि. प. शाळेचा कायापालट

मजुरांकडून जि. प. शाळेचा कायापालट

Next
ठळक मुद्देनियमांचे पालन : गावकऱ्यांशी संपर्कात न येता योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : परराज्य व परजिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले ११ मजूर स्वगावी परतल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रानबोथली येथील जि. प. शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांनी स्वत:चे आरोग्य जपत, आरोग्य प्रशासनाच्या सूचनांचे पालक करून शाळेचा परिसर स्वच्छ केला. खूप दिवसांपासून तहानलेल्या वृक्षांना नियमित पाणी देऊन परिसरात वृक्षांची लागवड केल्याने शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.
रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात झाडांची संख्या भरपूर असल्याने पालापाचोळा पसरला होता. त्यामुळे शालेय परिसर ओसाड दिसत होते. गावातील कोणत्याही व्यक्तींशी संपर्कात न येता विलगीकरणाच्या कालावधीत शालेय परिसराची स्वच्छता केली. झाडांची छाटणी करून व्यवस्थित आकार दिला. सकाळी व सायंकाळी परिसरातील वृक्षांना नियमितपणे पाणी पुरवठा सुरू केला. परस बागेतील तण व कचरा काढून स्वच्छ केले. मोकळ्या जागेत नवीन वृक्षांची लागवड केल्याने शाळेचा चेहरामोहरा बदलला. कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना समन्वय समितीचे अध्यक्ष सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापकांनी मजुरांना आरोग्याचे धडे दिले.

Web Title: From the laborers, Dist. W. Transformation of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.