शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

'सोशल मिडिया’द्वारे जि.प.चे विद्यार्थी घेताहेत ज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

गटशिक्षणाधिकारी फटींग व केंद्रप्रमुख कुमरे यांच्या कल्पनेतून हा गृ्रप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात विद्यार्थी ग्रुपवर आलेल्या भाषा, गणित, सामान्यज्ञान आदी विषयांवरील प्रश्न सोडवतात. गोष्ट पूर्ण करतात. गणितीय कोडे भाषिक कोडे सोडवतात. अशा विविध विषयांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही मार्गदर्शन करण्यास सरसावले आहेत.

ठळक मुद्देकोरोना सुट्यांचा उपयोग : पालकही करतात मार्गदर्शन

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सुट्टी जाहीर झाली. मात्र, विद्यार्थी सुट्टीचा वापर अभ्यासासाठी करतील याची खात्री नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व उपक्रमशील शिक्षकांनी जि. प. उच्च प्राथमिक शाळा कवठी येथील विद्यार्थांसाठी ‘किलबिल व्हॉट्सग्रुप' तयार करून ज्ञानाचे धडे देत आहेत.गटशिक्षणाधिकारी फटींग व केंद्रप्रमुख कुमरे यांच्या कल्पनेतून हा गृ्रप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात विद्यार्थी ग्रुपवर आलेल्या भाषा, गणित, सामान्यज्ञान आदी विषयांवरील प्रश्न सोडवतात. गोष्ट पूर्ण करतात. गणितीय कोडे भाषिक कोडे सोडवतात. अशा विविध विषयांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही मार्गदर्शन करण्यास सरसावले आहेत. यातून उत्तम मातीकाम, कागद कामाची कलाकृती साकार झाल्या. सुजल देरकर तेजस वाढई, गोपाळ गौरकार, कृष्णा गौरकार, वैष्णव गौरकार यांनी स्वानुभवातून मातीपासून गणपती मूर्ती तयार केली.अंशु ताजने याने निरूपयोगी वस्तुंपासून वाहन, आचल जुनघरे हिने धान्यापासून हत्ती तयार केला. रोशन मोहितकर याने तीन अंकी संख्येची बेरीज अचूक सोडविली. सहकार्य करणारी त्याची बहिण रेश्मा हिनेही स्वत:चा अभ्यास करून मार्गदर्शन केले. दिव्यांनी ताजने, तन्वी येरगुडे, श्रेया वाघाडे यांच्यासारख्ये बरेच विद्यार्थ्यांमध्ये आता अभ्यासाची चुरस निर्माण झाली. विशेष म्हणजे एकाच मोबाईलवरून २-३ विद्यार्थी चाचणी सोडवतात, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी फटींग यांनी दिली. 

टॅग्स :Socialसामाजिक