शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा किट देण्याची जबाबदारी शेतमालकाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

मागील काही दिवसामध्ये जिल्ह्यात सोयाबिन पिकांवर खोडमाशीचा तर कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सध्या विविध किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी किटकनाशक फवारणी करणाऱ्यांना सुरक्षा किट देत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षामध्ये विषबाधा झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदक्षता घ्या : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ढगाळी वातावरणामुळे उभ्या पिकांवर विविध रोग तसेच कीटकजन्य आजारांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. पिकांवर किटकनाशकांची फवारणी करणाऱ्याला मजुराला सुरक्षा किट पुरविण्याची जबाबदारी संबंधित शेतमालकीची असून त्यांनी शेतमजुरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.मागील काही दिवसामध्ये जिल्ह्यात सोयाबिन पिकांवर खोडमाशीचा तर कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सध्या विविध किटकनाशकांची फवारणी केली जात आहे.जिल्ह्यातील काही शेतकरी किटकनाशक फवारणी करणाऱ्यांना सुरक्षा किट देत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षामध्ये विषबाधा झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.अशी घ्यावी काळजीगळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन घ्यावे, किटकनाशक फवारणी यंत्रात भरताना खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी, तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप कीटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत, फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याचे स्वच्छ धुवावे, खराब झालेले नोझल्स वापरू नये, कीटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे, फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांडाचा किंवा काठीचा वापर करावा, कीटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रम करताना वा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे, फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवूनच अन्न पदार्थाचे सेवन करावे, फवारणीवेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे, उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी, फवारणीत वापरलेली भांडी, इतर साहित्य नदी, नाला वा विहिरीजवळ धुवू नयेत. हे साहित्य धुतांना वापरलेले पाणी पडीक जमिनीत टाकावेत अथव मातीत पुरवावे.विषबाधेची लक्षणे उपाययोजनाविषबाधा ही कीटकनाशके तसेच तणनाशकांचा त्यांच्याशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते. विषबाधा आणि इतर आजार यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते. फवारणी केल्यानंतर अशक्तपणा व चक्कर येते, त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, जळजळ होणे आदी लक्षणे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती