बल्लारपूर आगारात होते लाकडांची अदलाबदल

By Admin | Updated: March 20, 2015 01:09 IST2015-03-20T01:09:03+5:302015-03-20T01:09:03+5:30

बल्लारपूर येथील लाकूड विक्री आगारात लावलेल्या लॉटमधून लाकडाची परस्पर विक्री होत आहे. तसेच लाकडाची अदलाबदली करण्याचा प्रकार संबंधितांकडून होत आहे.

Interchange of wood in the palace of Ballarpur | बल्लारपूर आगारात होते लाकडांची अदलाबदल

बल्लारपूर आगारात होते लाकडांची अदलाबदल

कोठारी : बल्लारपूर येथील लाकूड विक्री आगारात लावलेल्या लॉटमधून लाकडाची परस्पर विक्री होत आहे. तसेच लाकडाची अदलाबदली करण्याचा प्रकार संबंधितांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून तसा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बल्लारपूर येथे वनविभागाचे मध्यवर्ती लाकूड विक्री आगार आहे. या आगारात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ठ इमारती लाकूड विक्रीसाठी दररोज येते. यात महिन्यातून एकदा किंवा दोनदा लाकूड खरेदीदारांना बोलावून विक्री करण्यात येत. बल्लारपूर आगारातील लाकडे चांगल्या प्रतीची असल्याने येथील लाकडांना बाजारात चांगली पसंती मिळते. त्यामुळे आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यातील ठेकेदार लाकडे खरेदीसाठी गर्दी करतात.
या आगारात २५ ते ३० लाकडांचे प्लाट आहेत. प्रत्येक प्लॉटवर सागवान व सिसमसह इतर इमारतीचे लॉट विक्रीसाठी लावण्यात येतात. मात्र विक्रीसाठी लावलेल्या प्लॉटमधून लाकडाची परस्पर विक्री किंवा विक्री केलेल्या लॉटमधून लाकडांची अदलाबदली करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसापासून सुरू आहे.
हा सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेआड कसा होत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असाच काहीसा प्रकार प्लॉट क्रमांक ३७२३ मध्ये करण्यात आला. यात प्लॉटमध्ये ३६ सागवानी नग होते. मात्र त्यातील सात नग बदलविण्यात आले. त्याचा आकारही जुळत नाही. बदलविण्यात आलेल्या लाकडावर गेरू मारून नसल्याने सदर प्रकार लक्षात आला.
ठेकेदारांनी लाखो रुपये मोजून प्लॉट खरेदी करायचे मात्र त्यात अदलाबदली करून ेस्वत:चे खिसे गरम करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. आगारावर नियंत्रण
ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यां मार्फत हा प्रकार सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकाराची वरिष्ठांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून त्याकडे वरिष्ठांचे कायम दुर्लक्ष होत आहे. परिणामी संबंधिताना मोठा आर्थिक फटका बसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Interchange of wood in the palace of Ballarpur