पुनर्रमुल्यांकनात कोटगाववर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:34+5:302020-12-13T04:41:34+5:30

फोटो नागभीड : तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या जिल्ह्यातील संपूर्ण ...

Injustice on Kotgaon in re-evaluation | पुनर्रमुल्यांकनात कोटगाववर अन्याय

पुनर्रमुल्यांकनात कोटगाववर अन्याय

फोटो

नागभीड : तालुक्यातील कोटगाव या गावाने जिल्हास्तरीय आदर्श स्मार्ट गावाच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या. स्पर्धेत असलेल्या जिल्ह्यातील संपूर्ण गावांच्या तुलनेत कोटगाव हे गाव तसूभर पुढेच होते. मात्र केवळ राजकीय दबावापोटी दुसºयाच गावास पहिल्या क्रमांकाची पसंती देण्यात आली. हा कोटगाव या गावावर अन्याय असून पुन्हा मुल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी गावकºयांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पुनर्रमुल्यांकन न झाल्यास जि.प.समोर उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

१९५६ मध्येच आदर्श गावाची पताका फडकावणाºया कोटगावने गेल्या काही वर्षात शासनाच्या आदर्श ग्राम योजनेत अनेकदा सहभाग घेतला. नुसता भागच घेतला नाही तर या गावाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. लोक सहभागाच्या बाबतीत हे गाव नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावात कोणताही सामुदायिक कार्यक्रम असो या गावाने कधीच पाय मागे घेतले नाही.

यावर्षीही कोटगावने जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला आणि या गावात वेगळाच हुरूप निर्माण झाला. स्मार्ट ग्रामच्या ज्या काही अटी नियम आहेत, त्या अटी नियमांची पूर्तता करण्यासाठी या गावाने कंबर कसली आणि गावात लोकसहभागाने कोटगाववासीयांनी अनेक कामे पूर्ण केली. एवढेच नाही तर आदर्श स्मार्ट ग्राम योजनेत अंतर्भूत शासकीय कागदपत्रांची पूर्तता, शासकीय नियमानुसार गावातील कामेही केली.

बॉक्स

अधिकाºयांनी येऊन गावाची तपासणीही केली

मुल्यांकनासाठी आलेले अधिकारी गावात आले. गावाची तपासणी केली.पण योजनांची माहिती असलेले बुकलेट घेऊन गेले नाही. कागदपत्रांची पूर्तता करा आपले गुण नक्कीच वाढतील, असा सल्ला मात्र या अधिकाºयांनी दिला. या स्मार्ट ग्राम स्पर्धेचा निकाल आला, तेव्हा गावकºयांना चांगलाच धक्का बसला. कारण निवडीत कोटगावला वगळण्यात आले होते. या अन्यायाविरोधात गावकºयांनी लढा देण्याचा निर्णय घेतला असून प्रथमत: गावकºयांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून पुनर्रमुल्यांकनाची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने गावकºयांनी आता विभागीय आयुक्तांना पुनर्रमुल्यांकनासाठी साकडे घातले आहेत.

Web Title: Injustice on Kotgaon in re-evaluation