शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर वाढला कामाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे, नाकाबंदी, गर्दीचे व्यवस्थापन, ...

ठळक मुद्देनाकाबंदीसह इतर कामे : लोक बाहेर पडू लागल्याने वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे, नाकाबंदी, गर्दीचे व्यवस्थापन, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेला परिसर सील करणे आदी कामांचा भार आधीच पोलीस प्रशासनावर आहे. त्यातच ठिकठिकाणी अडकलेले मजूर व कामगार आपआपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवतांना पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे.मागील काही दिवसांत परप्रांतीय मजुरांची पाठवणी आणि त्यांचे पास व नोंदणी कागदपत्रे तपासणी करणे, त्यात नव्याने भर म्हणून सोमवारपासून आधीच बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांना विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना एसटीने पाठविण्याची जबाबदारी देखील आहे. या अतिरिक्त कामामुळे पोलिसांवर कामाचा ताण व व्याप वाढू लागला आहे. त्यातच बुधवारी बिनबा गेट परिसरात एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे बिनबा गेट परिसर सील करण्यात आला. तसेच त्या परिसरात येणाºया जाणाºया नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे.चंद्रपूर शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, रामनगर आदी परिसरात पोलीस चौकी लावून तैनात आहेत. येणाºया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करीत आहेत. विनाआवश्यक बाहेर पडणाऱ्यांवर दंड वसूल करण्यात येत आहे.कर्तव्य व कौटुंबिक जबाबदारी पेलताना कसरतकायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करताना सध्या पोलिसांना रात्रदिवस डोळ्यात तेल घालून काम करावे लागत आहे. त्यातच पोलीस कर्मचाºयांनाही कोरोनाबाधेची चिंता सतावत असल्याने त्यांना त्यांच्या आरोग्यासाठीही जपावे लागत आहे.कोरोनाच्या लढ्यात पोलीस जीवाची बाजी लावून काम करत असून परराज्यात किंवा जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी पास मंजूर करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही असतो. आपले कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी पेलताना पोलिसांची कसरत होत आहे. तरीसुद्धा पोलीस चोख कर्तव्य बजावत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस