शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उर्वरित वेळेत उदरनिर्वाहासाठी विविध काम करणे सुरु केले आहे. काही शिक्षक शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र कोरोनामुळे शिकवणीवरही निर्बंध आले आहे. परिणामी आर्थिक अडचणीत त्यांना एक एक दिवस काढावा लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनाने बदलविले जगण्याचे तंत्र : बारामती येथील आंदोलनाला शिक्षकांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विना अनुदानित तत्त्वावर काम करणाºया शिक्षकांचे पगाराविना हाल सुरू आहेत. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्यांच्यावर ना काम, ना वेतन अशी वेळ आली आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी तसेच शिक्षकांनी त्यांना आर्थिक मदत करून दिलासा देण्याची गरज आहे.विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उर्वरित वेळेत उदरनिर्वाहासाठी विविध काम करणे सुरु केले आहे. काही शिक्षक शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र कोरोनामुळे शिकवणीवरही निर्बंध आले आहे. परिणामी आर्थिक अडचणीत त्यांना एक एक दिवस काढावा लागत आहे. विविध संघटनांच्या संघर्षाने २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कायम हा शब्द वगळला व मूल्यांकनाच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर अनुदान मिळाले नाही. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदान दिले. मात्र ते अनुदान निधीमुळे प्रतिक्षेतच आहे. घरी राहून सुरक्षित राहा, असा संदेश दिल्या जात आहे. मात्र उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल सुरु आहे. मागील अनेक वर्षांपासून आज ना उद्या नियमीत वेतन सुरु होईल, या आशेवर शिक्षक कर्तव्य बजावत आहेत. मात्र शासनाकडून त्यांना केवळ आवश्वासनच देण्यात येत आहे. त्यामुळे विविध आंदोलन करून शासनानेचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र अद्यापही कोणताही फायदा झाला नाही.इंग्रजी शाळेतील शिक्षकही हैराणकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही शाळा, महाविद्यालय सुरु झाले नाही. इंग्रजी शाळांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फी मधून वेतन दिले जाते. मात्र शाळा सुरु नसल्याने पालक फी भरण्याच्या मानसिकतेच नाही. त्यामुळे इंग्रजी शाळांतील शिक्षकांचेही वेतन अडले आहे.विशेष म्हणजे, काही मोठ्या शाळांतील शिक्षकांना अर्धेच वेतन दिल्या जात आहे. मात्र आर्थिक स्थिती कमजोर असलेल्या शाळांतील शिक्षकांना वेतनच दिल्या जात नसल्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील काही शाळांनी पालकांकडे फी भरण्यासाठी एसएमएस पाठविणे सुरु केले आहे. त्यामुळे काही पालक फी भरत आहेत. तर काहींनी शाळा सुरु झाल्याशिवाय फी भरणार नसल्याचेही संस्थाचालकांना सुनावले आहे. यावर तोडगा म्हणून काही शाळांनी फी मधील रकमेमध्ये काही टक्क्यांची सुटसुद्धा दिली आहे. असे असले तरीही पालक फी भरण्याच्या मानसिकतेत नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा