शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

1,400 ऑक्सिजन बेड्सला आणखी किती दिवस वाट पहावी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला. आता तर या रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्हाभरात ११ डीसीएच, २९ डीसीएससी व १८ सीसीसी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडची लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे, तसेच गंभीर लक्षणे अशा तिन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी तातडीने आरोग्य सुविधा निर्माण करण्यात प्रशासनाने मार्च महिन्यात झपाट्याने काम केले.

ठळक मुद्देनागरिकांचा सवाल : कोविड रुग्णसंख्या वाढूनही ऑक्सिजन बेड्स १,२९६

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविडबाधित गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स बेड्स उपलब्ध करून देणे हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असूनही ऑक्सिजन बेड्सची संख्या अजूनही १,२९६ पलीकडे केली नाही. त्यामुळे प्रस्तावित १,४०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होण्यास आणखी किती दिवस लागणार, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांकडून विचारला जात आहे.कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला. आता तर या रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्हाभरात ११ डीसीएच, २९ डीसीएससी व १८ सीसीसी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडची लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे, तसेच गंभीर लक्षणे अशा तिन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी तातडीने आरोग्य सुविधा निर्माण करण्यात प्रशासनाने मार्च महिन्यात झपाट्याने काम केले. त्याचे परिणामही दिसून आले. लक्षणे नसणाऱ्यांचे गृहविलगीकरण व सौम्य लक्षणे असणाऱ्यांना सीसीसीमध्ये दाखल करून उपचार सुरू झाले. कोरोना संसर्ग साखळी रोखण्यासाठी ११ डीसीएच, डीसीएससी व सीसीसी रुग्णालयांची व्याप्ती महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र, गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी झालेल्या रुग्णांना तत्काळ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याच्या आघाडीवर प्रशासनाला अजूनही पूर्णत: यश आले नाही. 

सीसीसीच्या १७०० बेड्सचे काय?जिल्ह्यातील १८ कोविड केअर सेंटरमध्ये २,८०० बेड्स उपलब्ध झाल्या. संसर्गाचा वेग लक्षात घेऊन पुन्हा १,७०० बेड्सचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, यासाठी इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. चंद्रपुरातील महिला रुग्णालयात १७५ ऑक्सिजन बेड्स उपलब्ध झाले. पुन्हा १७५ बेड्सच्या नियोजनाची कार्यवाही सुरू असल्याचे समजते. गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाने इमारती ताब्यात घेण्यासोबतच बेड्सचा प्रश्न सोडविला पाहिजे.  

तालुक्यातील बेड्सला होतोय विलंब सर्वच तालुक्यात सुमारे ३० ते ५० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली. यातील काही रुग्णालयांचे काम सुरू झाले, पण या कामाला आधीच विलंब झाला. हे काम विहित कालावधीत मार्गी लागले नाही, तर कोविडबाधित गंभीर रुग्णांच्या मृतांची संख्या पुन्हा वाढू          शकते.

चंद्रपूर मनपाचे जम्बो हॉस्पिटल कागदावरचजिल्ह्यात ५०० बेड्सचे जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यामध्ये ४०० ऑक्सिजन बेड्स व १०० आयसीयू बेड्स तयार करण्यात येतील, असेही प्रशासनाने जाहीर केले. गंभीर रुग्णांची संख्या बघता, आता हे जम्बो हॉस्पिटल कार्यान्वित करण्याची गरज आहे. मनपाने रैन बसेरा येथे हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली, पण हे हॉस्पिटल कागदावरच आहे. वन अकादमीतील १५० ऑक्सिजन बेड्सचे काम सुरू असल्याने हाच एक दिलासा आहे. 

ऑक्सिजन मुबलक मात्र बेड्सची कमतरता जिल्ह्याला ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच महिला रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू आहे.  याशिवाय क्रायोजेनिक आक्सिजन जनरेट प्लांट उभारल्या जात आहे. या प्लांटमधून दररोज ५०० सिलिंडर रिपिलिंग करता येऊ शकतात. प्लांटमधील आक्सिजन शुद्धताही ९८ टक्के राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा नाही, तर बेड्सचीच कमरता आहे. हेच आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या