शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील चौकात होर्डिंग्जची गर्दी !

By admin | Updated: December 28, 2015 01:22 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील चौक होर्डिंग्जने बरबटल्याचे दिसून येत आहे.

चौकाचे सौंदर्यीकरण बाधित : मुदत संपल्यावरही होर्डिंग्ज कायमचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील चौक होर्डिंग्जने बरबटल्याचे दिसून येत आहे. यातील काही होर्डिंग्ज तर विना परवानगीने लावण्यात येतात. कधी मुदत संपूनही होर्डिंग्ज काढले जात नाही. त्यामुळे चौकातील सौंदर्यच नष्ट होत आहे. कुणाचा वाढदिवस असो, कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन असो, राजकीय पक्षांचे मेळावे असो वा राजकीय नेत्यांचे आगमन, शहरातील चौकाचौकात होर्डिंग्ज लावून जाहिराती करण्याचे चंद्रपुरात जणू फॅडच निघाले आहे. अलिकडच्या काही दिवसात तर विशिष्ट सणाला शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या चंद्रपुरात जटपुरा चौक, गिरनार चौक, प्रियदर्शिनी चौक, जनता कॉलेज चौक, छोटा बाजार, महात्मा गांधी मार्ग, जयंत टॉकीज चौक, बंगाली कॅम्प चौक, नागपूर मार्ग, सीटी पोस्ट आॅफीस चौक यासह अनेक चौकात होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. काही होर्डिंग्ज तर चक्क रस्त्यावर आलेले आहेत. याशिवाय अनेकजण होर्डिंग्ज लावताना मनपाची रितसर परवानगी घेत नाही. काही जण परवानगी घेतात, पण मुदतीनंतरही होर्डिंग्ज लावलेलेच असतात. याबाबत मनपाने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे होर्डिंग्ज लावणाऱ्यांचे फावत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी मनपा प्रशासन यासंदर्भात गंभीर झाले होते. मनपाने अनधिकृत होर्डिंग्जविरुध्द मोहीम सुरू केली. अनेक होर्डिंग्ज काढले. त्यानंतर ही मोहीम बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा चंद्रपुरातील चौकाचौकात होर्डिंग्ज बाजार लागलेला दिसत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)निविदेची प्रकियाही रखडलीकर्मचाऱ्यांचा अभावामुळे शहरातील प्रत्येक चौकात लावलेल्या होर्डिंग्जची मुदत तपासणे, परवानगी तपासणे आदी बाबी शक्य होत नसल्याने याचे टेंडर काढून खासगीकरण करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. प्रकाश बोखड हे आयुक्त असताना टेंडरही काढण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया पुढे सरकलीच नाही. त्यामुळे कुणालाही याचे टेंडर देण्यात आले नाही.होर्डिंग्जला मर्यादा असावीचौकाचे सौंदयीकरण अबाधित रहावे व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चौकाचौकात लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्जला मर्यादा असणे आवश्यक आहे. कोणत्या चौकात किती होर्डिंग्जला परवानगी द्यायची याचेही मनपा प्रशासनाने नियम तयार करावे. तरच या अमर्याद होर्डिंग्जबाजीवर आळा बसू शकेल.