शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अहो, कुणी कर्ज देता का कर्ज?

By admin | Updated: November 11, 2015 00:39 IST

नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे,...

बेरोजगारांचा टाहो : बँकांकडून केली जाते थट्टागुंजेवाही : नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी पंतप्रधान रोजगार योजनेसह अनेक योजना अंमलात आल्या. प्रत्यक्षात मात्र या योजना बेरोजगार तरुणांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारे सिंदेवाही तालुक्यातील अनेक बेरोजगार बँकांच्या पायऱ्या झिजवून थकलेले आहेत. मात्र त्यांची वनवन भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘अहो, कुणी कर्ज देता का कर्ज’ असा टाहो बेरोजरागार फोडत आहेत. जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी शासनाच्या विविध योजनेखाली कर्ज घेवून स्वावलंबी व्हावे तसेच शासनाचे निर्देश असताना काही बँका अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे कारागिर व सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज मिळण्यास जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तसेच बँकेचे उंबरे झिजवावे लागत आहेत. शासनाने सुशिक्षित बेरोरजगारांसाठी अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या. बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी बँकेचे कर्ज घेवून स्वावलंबी व्हावे व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा मुळ उद्देश आहे.परंतु या योजनेकरिता व कर्जाकरिता लागणारी कागदपत्रे आणि मंजुर करून घेण्याकरिता संबंधितांना द्यावी लागणारी पाच टक्के रक्कम आणि पायपीट यातच सुशिक्षितच बेरोजगार व कारागीर थकून जात आहेत. संबंधीत अधिकारी लाभार्थी निवडून मोठ्या लाभार्थ्यांना एक ते दोन लाख, मध्यम ५० ते ६० हजार, अधिक गरीब लाभार्थ्याला २० ते ३५ हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. दुसरे कोणतेही साधन नसल्याने गरीब लाभार्थ्यांना एक लाख रुपयाची अपेक्षा असतानाही २० ते ३५ हजार रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी तयार लाभार्थ्यांना जवळजवळ सहा ते सात महिन्यांपर्यंत चकरा माराव्या लागतात. अडवणुकीचे धोरण अवलंबविणाऱ्या बँकांकडून सबब पुढे करून सुशिक्षित बेरोजगारांना व कारागीरांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)