शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: June 19, 2017 00:53 IST

सरकार मोठ-मोठ्या घोषणा करते, पण अंमलबजावणी नाही, सध्याचे सरकार घोषणा करण्यात माहीर आहे.

जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन : शिवसेनेचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सरकार मोठ-मोठ्या घोषणा करते, पण अंमलबजावणी नाही, सध्याचे सरकार घोषणा करण्यात माहीर आहे. सरकारने घोषणा करून सुध्दा शेतकऱ्याला अजूनपर्यंत १०हजार रूपये कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे या सरकारने जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची थट्टा चालविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतिने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. आजचा शेतकरी या सरकारच्या पोकळ घोषणामुळे त्रस्त झालेला आहे यातच भारतीय चलनातील नोटा बंद होऊन जवळपास सहा ते सात महिने होऊन गेले, परंतु बँक किवा ए.टी.एम च्या स्थितीत बदल झालेला नाही, ए.टी.एम मध्ये पैसे नाही, ए.टी.एम समोर तसेच बँकेच्या समोर पैसे मिळण्याच्या आशेने ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टीचे असतात त्यामुळे सोमवारी बँक मध्ये खूप मोठी लाईन असते. मात्र यादरम्यान बँकेतील कर्मचारी ग्राहकांना योग्य ती मदत करीत नाही. शासनाने घोषणा करूनसुध्दा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना १०हजार रूपये कर्ज देण्यात आलेले नाही. बँकच्या इाटरनेट लिंक खूप कासव गतीने काम करतात आणि त्यामुळे ग्राहकांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागते. शासनाचे कर्मचारी ग्राहकांशी सभ्य रीतीने वागत नाही. मुद्रा लोन या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत नाही, मुद्रा लोनसाठी बँकेतील कर्मचारी लाच मागतात म्हणून या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत नाही, अश्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी, शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे सोडून बँकेसमोर पीक कर्ज मिळण्यासाी दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. शासनाचे याकडे लक्ष नसून शासन सुस्त झाले आहे. मात्र त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाला शेतकऱ्यांची काळजी नाही त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संपुर्ण अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. करीता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश शासनाने निर्गमित करावे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. या शिष्टमंडळात किशोर जोरगेवार, रवींद्र लोनगाडगे, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, राजेश नायडू उपस्थित होते.