डीएनए चाचणीत त्याचाच मुलगा पण स्विकारण्यास दिला नकार; घरात न येऊ देता पती अन् सासूने केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:25 IST2026-03-14T13:24:36+5:302026-03-14T13:25:19+5:30
Chandrapur : पत्नीला व मुलाला घरी नेत नसल्याने जबरदस्तीने घरी गेलेल्या पत्नीला पती व सासूने निर्दयतेने बेदम मारहाण केल्याची घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली.

He refused to accept his own son in the DNA test; He was beaten up by his husband and mother-in-law for not allowing him to enter the house.
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर (चंद्रपूर) : पत्नीला व मुलाला घरी नेत नसल्याने जबरदस्तीने घरी गेलेल्या पत्नीला पती व सासूने निर्दयतेने बेदम मारहाण केल्याची घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती नरेंद्र महादेव कोलते आणि सासू सोनाबाई महादेव कोलते यांना अटक केली आहे.
शंकरपूर येथील पौर्णिमा बबन बगाडे या घटस्फोटित महिलेशी नरेंद्र कोलते याचे प्रेमसंबंध जुळले होते. २०१५ मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर नरेंद्र पौर्णिमाच्या घरी मुक्कामाला जायचा, त्यातून २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. मात्र, काही दिवसांनी नरेंद्रने 'हा मुलगा माझा नाही' असा पवित्रा घेतला. पौर्णिमाने न्यायालयात धाव घेतल्यावर डीएनए (डीएनए) चाचणीत तो मुलगा नरेंद्रचाच असल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान, मागील १० वर्षांपासून नरेंद्र 'तुला आणि मुलाला घरी नेतो' असे म्हणून हुलकावणी देत होता. अखेर ७ मार्च रोजी सायंकाळी पौर्णिमाने मुलासह पतीचे घर गाठले. मात्र, तिथे गेल्यावर पती आणि सासूने तिला घरात ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आणि जबर मारहाण करून घराबाहेर, हाकलले. जखमी अवस्थेत पौर्णिमाने पोलिस चौकी गाठून तक्रार दिली. तिला सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर व नंतर गंभीर जखमा असल्याने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अशी माहिती पालिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी नरेंद्र आणि सोनाबाई कोलते यांच्यावर कलम ११८ (२), ३ (५), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.