महत्प्रयासाने उगविलेले पीक रानडुकरांकडून फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:50+5:30

वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा उपवनक्षेत्रातील कोटबाळ, गुजगव्हान शिवारातील संजय निब्रड, झित्रु बरडे, महेंद्र गारघाटे, रामकृष्ण ठोक, बंडू चवले, राजु आत्राम, वसंत पिजदूरकर, बंडू मिलमिले, किशोर जेवूरकर, कवडू निब्रड, वासुदेव डाखरे आदी शेतकºयांच्या शेती आहेत. यातील काही शेती जंगलाला लागून तर इतर जंगलापासून दूर आहे.

Hardly grown crops are harvested by cattle | महत्प्रयासाने उगविलेले पीक रानडुकरांकडून फस्त

महत्प्रयासाने उगविलेले पीक रानडुकरांकडून फस्त

Next
ठळक मुद्देअनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यात तारेवरची कसरत करीत शेतीची मशागत करून कापूस व सोयाबीन बियाण्यांची लागवड केली. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. काहींनी महत्प्रयासाने सोयाबीन उगविले. मात्र कपाशी व सोयाबीन बियाणे उगवताच वन्यप्राण्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्यामुळे अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा उपवनक्षेत्रातील कोटबाळ, गुजगव्हान शिवारातील संजय निब्रड, झित्रु बरडे, महेंद्र गारघाटे, रामकृष्ण ठोक, बंडू चवले, राजु आत्राम, वसंत पिजदूरकर, बंडू मिलमिले, किशोर जेवूरकर, कवडू निब्रड, वासुदेव डाखरे आदी शेतकºयांच्या शेती आहेत. यातील काही शेती जंगलाला लागून तर इतर जंगलापासून दूर आहे. या शेतकऱ्यांनी चालू हंगाम करीत शेतीची मशागत करून कापूस व सोयाबिनची पेरणी केली. सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांची उगवन झाली. त्यानंतर तुरळक प्रमाणात पाऊ स आल्याने दोन्ही पिके बऱ्यापैकी जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच रोही, रानटी डुक्कर, हरीण यांच्या कळपाने सोयाबीन व कपाशीच्या पिकात धुमाकूळ घालत शेतातील सर्व सोयाबीन व कपाशीचे पीक उद्ध्वस्त करून टाकले. यातील काही शेतकºयांनी बियाणे कृषी केंद्रातून उधारीवर घेतले तर काहींनी उसनवारी रक्कम घेवून बियाणे विकत घेत पेरणी केली होती.
आता शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता संपल्याने ऐन हंगामात शेत ओसाड राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नासाडी झालेल्या पिकांना आधी नुकसान भरपाई देण्याची मागणी वरोरा येथील वनविभागाच्या कार्यालयाकडे केली आहे.

उगविलेले सोयाबीन व कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केल्याच्या तक्रारी कार्यालयात आल्यानंतर पंचनामे करण्यात आले आहे. ते आता वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
- एम. पी. राठोड,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा

Web Title: Hardly grown crops are harvested by cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.