शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळी स्वस्त करण्यात सरकार अपयशी

By admin | Updated: November 13, 2015 01:00 IST

जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे.

काँग्रेसचा आरोप : सरकारचे आश्वासन फसवे चंद्रपूर : जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे. ऐन दिवाळीच्या दिवसातही डाळ २०० रूपये किलोच्या भावाने विकली जात असल्याने सरकार दरवाढ रोखण्यात अपयशी ठरली असून सरकारचे आश्वासनही पोकळ निघाल्याची टीका चंद्रपर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.तुर डाळीचे भाव कमी करण्याचे आश्वासन सरकारने दसऱ्याच्या दरम्यान जनतेला दिले होते. मात्र आजही दर कायमच असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, प्रदेश अनुसुचित जाती विभागाचे महासचिव संजय रत्नपारखी उपस्थित होते. डाळीच्या दरवाढीच्या पुराव्यादाखल नागरकर यांनी चंद्रपुरातील धान्य बाजारातून खरेदी केलेल्या दोन किलो डाळीच्या पावत्यांसह डाळच सादर केली. ते म्हणाले, आजही जनतेला महाग डाळ विकत घ्यावी लागत आहे. ८० रूपये किलोवर हा दर जायला नको असतानाही नाईलाजाने नागरिकांना खरेदी करावी लागत आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. सरकावरने साठेबाजांवर कावरवाईचा फार्स केला. मात्र जप्तीनंतर ही डाळ त्यांना परत देण्याचे औदार्यही या सरकारने दाखविले, याबद्दल आश्चर्य आहे. यावरून हे सरकार कुणाच्या पाठीशी उभे आहे, याची कल्पना येते. गरिबांना अंत्योदय आणि बीपीएलमध्ये डाळ मिळणे दूरच, साधे धान्यही मिळत नाही. काँग़्रेसच्या काळात बीपीएल, एपीएल घटकातील जनतेला धान्य सहज मिळायचे. सर्वसामान्यांच्या योजना या सरकारने बंद करण्याचा सपाटा चालविल्याने सरकारचे निर्णय चुकीचे ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा निषेध करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. डाळीचे दर न उतरल्यास काँग्रेसकडून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्ष सुलेमान अली, श्याम राजुरकर, ज्योती कमवेलकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)